'लव टाईम'मध्ये मॅचचा स्कोर पाहणं त्याला पडलं महागात; कंटाळून गर्लफ्रेंडने दुसऱ्यासोबत केलं असं की...!

मुख्य म्हणजे यामध्ये सर्वात आश्चर्यकारक कारण समोर आणलं म्हणजे सेक्स दरम्यान फोनवर पार्टनर स्कोअर तपासतो.

Updated: Nov 5, 2022, 10:31 PM IST
'लव टाईम'मध्ये मॅचचा स्कोर पाहणं त्याला पडलं महागात; कंटाळून गर्लफ्रेंडने दुसऱ्यासोबत केलं असं की...! title=

Girlfriend Cheats after Phone Spoils Mood: सेक्स करताना महिलांची उत्कटता आणि मूड खराब होण्याची काय कारणं असू शकतात याबाबत एक सर्व्हेक्षण करण्यात आलंय. एलिसिट एन्काउंटर्स या संस्थेकडून हे सर्व्हेक्षण करण्यात आलंय. यामध्ये जळपास 2 हजार महिला सहभागी झाल्या होत्या. मुख्य म्हणजे यामध्ये सर्वात आश्चर्यकारक कारण समोर आणलं म्हणजे सेक्स दरम्यान फोनवर पार्टनर स्कोअर तपासतो.

सेक्स करताना फोनचा वापर 

वेस्ट ससेक्समधील एका बारमेड सांगितलं की, नात्यातील गोडवा तेव्हा संपला ज्यावेळी तिला समजलं की, पार्टनरला तिच्यापेक्षा फोन जास्त आवडतो. ती म्हणाली की, सेक्स करताना वारंवार फोन वापरण्याच्या तसंच मेसेज वाचण्याच्या त्याच्या सवयीमुळे त्रास व्हायचा. इतकंच नाही तर यामुळे ती इतर मुलांच्या जवळ जाऊ लागली.

या महिलेच्या म्हणण्यानुसार, 'त्याला त्याचा फोन माझ्यापेक्षा जास्त आवडत होता. तो त्याच्या फोनपासून कधीच दूर राहू शकत नव्हता. मी त्याला सेक्स करताना बऱ्याचदा फोनचा वापर न करण्यास सांगितला. मात्र यावेळी त्याने मला नकार दिला.

सर्वेक्षणात अनेक महिलांनी सांगितली कहाणी

महिलेल्या सांगण्यानुसार, 'सेक्स दरम्यान बॉयफ्रेंड सतत फोन तपासाचा. त्याच्या या सवयीने मी कंटाळले होते. त्याच्या सततच्या फोन चेक करण्यामुळे आमच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत गेला. इतकंत नाही तर मी बाहेरील पुरुषांशी संबंध ठेवू लागली."