North Korea Kim Jong Un : जगभरात दोन वर्ष कोरोनाने (Corona) थैमान घातलेलं असताना उत्तर कोरियाने (North Korea) आमच्या देशात करोनाचा एकही रुग्ण नाही असा दावा केला होता. त्यानंतर उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन (Kim Jong Un) यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं. त्यानंतर उत्तर कोरियाने देशात अखेर कोरोना संसर्ग झाल्याचं अखेर मान्य केलं होतं
त्यानंतर किम जोंग उन यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी देशही कोरोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती. शुक्रवारी, किम जोंग उन यांनी राजधानी प्योंगयांगमध्ये कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढ्यात नेतृत्व केल्याबद्दल लष्करी वैद्यकीय कर्मचार्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा किम जोंग या कार्यक्रमात लोकांना संबोधित करत होते आणि ते हसले आणि असे काही म्हणाले की ते ऐकून तेथे उपस्थित असलेले लोक रडू लागले.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, किम जोंग यांनी गुरुवारी प्योंगयांगच्या 'एप्रिल 25 हाऊस ऑफ कल्चर'मध्ये कोरोनाकाळात फ्रंन्टलाईनवर तैनात असलेल्या वैद्यकीय कर्मचार्यांचे आभार मानण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता.
यामध्ये 'इमर्जन्सी अँटी-एपिडेमिक फ्रंट'वर पाठवण्यात आलेल्या कोरियन पीपल्स आर्मीच्या हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. किम जोंग उन यांनी कोरोनामुक्त झाल्याचे घोषित केल्यानंतर आणि निर्बंध शिथिल केल्यानंतर गेल्या आठवड्यात त्यांना या कामावरुन मुक्त करण्यात आलं.
North Korean military medics weep at Kim Jong-un's praise for the successful fight against COVID-19.
Recently, Kim Jong-un solemnly announced the victory over the coronavirus in North Korea. pic.twitter.com/cATi5Mq0pg
— NEXTA (@nexta_tv) August 19, 2022
किम यांनी भाषण करताना कोरोनाच्या परिस्थितीबद्दल भाष्य केले. त्यांनी कोरोनाच्या काळात लष्करी वैद्यकीय कर्मचार्यांच्या कार्याचे कौतुक करण्यास सुरुवात केली. कौतुक करताना ते हसले. दरम्यान, त्यांचे भाषण ऐकून तेथे उपस्थित असलेले बहुतांश लोक रडायला लागले.