Knowledge Story: प्रवासात वाहन सुरु होताच झोप का येते? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान

असं होण्यामागे वैज्ञानिक कारण आहे, हे तुम्हाला माहितीये का? 

Updated: May 7, 2022, 05:23 PM IST
Knowledge Story: प्रवासात वाहन सुरु होताच झोप का येते? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : दररोजच्या आयुष्यात अशा कित्येक गोष्टी घडतात ज्यांचा आपण नंतर विचार केल्यास मिळणारं उत्तर थक्क करणारं असतं. अशाच एका प्रसंगाबद्दल बोलूया. तुम्ही प्रवास केलाच असेल. प्रवास करत असताना कोणत्याही वाहनात तुम्ही बसलेले असाल, तर वाहन सुरु होताच तुम्हाला अचानक फार झोप येऊ लागते. 

असं होण्यामागे वैज्ञानिक कारण आहे, हे तुम्हाला माहितीये का? एका संशोधनातून यासंदर्भातली माहिती समोर आली आहे.  स्‍पीप डेब्‍ट, हाइवे हिप्नोसिस (Highway Hypnosis) ही यामागची कारणं असल्याचं समजलं जात आहे. 

कुठे जाण्यासाठी तुम्ही प्रचंड धावपळ केली असेल, बरीच तयारी केली असेल, कोणतीही गोष्ट मागे राहू नये हाच विचार तुमच्या मनात घोंगावत असेल तर, तुमची झोप पूर्ण होत नाही. यालाच  स्‍लीप डेब्‍ट (Sleep Debt) असं म्हणतात. प्रवासादरम्यान झोप येण्याचं हे महत्त्वाचं कारण. 

चालत्या वाहनात व्यर्थ बसून राहिलं असता एकाएकी झोप येण्यास सुरुवात होते. कारण, यावेळी शरीर आणि मेंदू अकार्यक्षम स्थितीत जातात. म्हणूनही प्रवासात फार झोप येते. 

तैयारी में पूरी नहीं होती नींद

वाहनाचं कंपनही झोपेला वाव देतं. अशा वेळी शरीर तसंच काम करतं, जेव्हा लहानपणी आई तुम्हाला अंगाई गाऊन, पाठ थोपटत झोपवत असे. वैज्ञानिक भाषेत याला रॉकिंग सेंसेशन (Rocking Sensation) असं म्हणतात. 

एक ही फ्लो में हिलने से आती है नींद

एकाच दिशेनं जेव्हा तुमच्या शरीराचं कंपन होत असेल, तर या कृतीलाही रॉकिंग सेन्सेशन म्हटलं जातं.  ज्यामुळं तुम्हाला झोप येऊ लागते. या प्रक्रियेला स्लो रॉकिंगही म्हटलं जातं.