अदर पुनावालांचा लंडनचा राजवाडा; भाडं ऐकून डोळे होतील पांढरे

अदर यांनी लंडनमध्ये एक राजवाडा भाड्यानं घेतलाय त्याचं भाडं ऐकल्यावर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.

Updated: Mar 25, 2021, 07:22 PM IST
अदर पुनावालांचा लंडनचा राजवाडा; भाडं ऐकून डोळे होतील पांढरे title=

जगातील सर्वात जास्त लस बनवणाऱ्या कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांच्या रॉयल लाईफबद्दल तसेच ऐशो आरामाच्या अनेक गोष्टी प्रसिद्ध झाल्या आहेत. पण कोरोना काळात सीरम इंन्स्टिट्यूटला वारेमाफ नफा झाला आहे. त्यामुळे आता अदर यांनी लंडनमध्ये एक राजवाडा भाड्यानं घेतलाय त्याचं भाडं ऐकल्यावर तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.
 
सीरम इंन्स्टिट्यूट ही कोरोनामुळे जगभरात प्रसिद्ध असलेली इंन्स्टिट्यूट बनली आहे. कोरोना काळात  कंपनीला जबरदस्त नफा झाला आहे. त्यामुळे आपल्या रॉयल लाईफस्टाईलमुळे आधीच प्रसिद्ध  असलेलेल सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांच्या लंडनमधील राजवाड्याची चर्चा जोरात आहे. 
 
अदर य़ांनी लंडनमध्ये हे राजवाडा राहण्यासाठी भाड्याने घेतला आहे.  पुनावाल्यांच्या नव्या राजवाड्याचं भाडं ऐकाल तर डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.  पुनावाला यांच्या नव्या राजवाड्याचं भाडं दर आठवड्याला 50 हजार पाऊंड इतकं आहे. आता आजच्या भारतीय दराने मोजायचं म्हटलं तर. पुनावाला यांच्या राजवाड्याचे भाडे आठवड्याला 50 लाख रुपये म्हणजे महिण्याला 2 कोटी रुपये इतके आहे. 
 
आता थोडंसं पुनावालांच्या या नव्या राजवाड्याविषयी...लंडन शहरापासून काही अंतरावर असणारा हा राजवाडा 25 हजार स्क्वेअर फुटाचा आहे. त्याची मालकीण पोलंडमधील अतिश्रीमंतांपैकी एक डॉमनिका कुलझुक आहेत. दरम्यान पुनावाला आणि कुलझुक या दोघांच्याही कंपन्यांनी अधिकृतपणे या 'भाडे' कराराविषयी बोलण्यास नकार दिलाय.