Old Monk रम बनवणारे कपिल मोहन यांचे निधन

देशातील लोकप्रिय रम ब्रांड म्हणजे ओल्ड माँक. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 9, 2018, 05:27 PM IST
Old Monk रम बनवणारे कपिल मोहन यांचे निधन  title=

मुंबई : देशातील लोकप्रिय रम ब्रांड म्हणजे ओल्ड माँक. 

ओल्ड माँक बनवणारे कपिल मोहन यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या ब्रांडला यशस्वी बनवण्यात यांचे मोठे योगदान असल्याचे म्हटले जाते. ब्रिगेडिअर असलेले कपिल मोहन यांना सरकारकडून 2010 साली पद्मश्रीने सन्मानित केले गेले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार 88  वर्षाचे असलेले कपिल मोहन यांनी 6 जानेवारी रोजी गाजियाबादमध्ये असलेल्या आपल्या घरी शेवटचा श्वास घेतला. कपिल मोहन हे ओल्ड माँक या रम बनवणाऱ्या मिकिन लिमिटेड कंपनीचे चेअरमन होते. ही कंपनी रम बनवण्याबरोबरच इतर अनेक ड्रिंक्स तयार करतात. 

1954 मध्ये लाँच झालेली ओल्ड माँक हे ब्रांड लोकप्रिय असून सर्वाधिक विकणारे म्हणून ओळखले जाते. त्यांच निधन होताच सोशल मीडियावर ही बातमी पसरली आणि सोशल मीडियावर ओल्ड माँग हा ट्रेंड निघाला. आणि सोशल मीडियावर नेटीझन्सनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

असा झाला Old Monk चा जन्म 

19 डिसेंबर 1954 रोजी ओल्ड माँक ही रम लाँच करण्यात आली. मोहन यांच्या लिडरशिपमध्ये 3 डिस्टीलरिज,  2 ब्रुअरिज आणि भारतात एक नवी फ्रँचायसी भारतात सुरू केली.  ओल्ड माँक ही अनेक काळापासून सर्वाधिक विकली जाणारी डार्क रम आहे. असं म्हटलं जातं की रम न पिणाऱ्या व्यक्तीने तयार केली ही सर्वाधिक लोकप्रिय Old Monk रम