Job News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात

Job News : तुमच्या कंपनीत असं काहीतरी सुरु नाहीये ना? आताच पाहा तुम्हाला याचा कितपत धोका; परिस्थिती किती वाईट आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण नोकरीच्या ठिकाणी तुमची गरजच नसेल 

Updated: Feb 8, 2023, 10:01 AM IST
Job News : तंत्रज्ञानच करणार घात! तब्बल 10 क्षेत्रांतील हजारो नोकऱ्या धोक्यात  title=
Job News Chat gpt Ai will risk thousands of jobs from diffrent sectors latest Marathi news

Job News : गेल्या वर्षअखेरीपासून देशभरात अनेकांनाच (Jobs Layoff) नोकरी गमवावी लागली. फक्त भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात ही परिस्थिती पाहायला मिळाली. 2023 मध्ये (Recession) आर्थिक मंदीची लाट येण्याची शक्यता आणि त्यात कंपन्यांना होणारं नुकसान पाहता अगदी ट्विटरपासून (Twitter) अॅमेझॉनपर्यंत (Amazon) बड्या कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला. काहीजण मात्र यातून तरले आणि आपली नोकरी टिकून आहे याबाबत त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण, आता मात्र अशा मंडळींच्याही नोकरीवर टांगती तलवार आली आहे. कारण ठरतंय ते म्हणजे तंत्रज्ञानात झालेली प्रगती. 

तंत्रज्ञानच गिळणार नोकऱ्या? 

बऱ्याच काळापासून ज्या Chat GPT ची चर्चा होत होती, तेच आता वापरातही आणलं जाऊ लागलं आहे. प्रथमर्शनी अनेकांनी याबाबत कुहूहल व्यक्त केलं पण, आता मात्र त्यापासून असणारा धोकाच अनेकांच्या चिंतेचं कारण ठरत आहे. 

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI वर आधारित असणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करत साकारण्यात आलेलं चॅटबॉट चॅटजीपीटी सुरु झाल्याच्या तुलनेत जानेवारी महिन्याच्या त्याचा वापर करणाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली. साधारण 10 कोटी Users वाढल्यामुळं याचा वापर नेमका किती झपाट्यानं वाढत आहे हेसुद्धा लक्षात आलं. सध्याच्या घडीला सातत्यानं वाढ होणाऱ्या युजर्सचा आकडा पाहता या अॅपचा वापर येणाऱ्या काळात तब्बल 10 क्षेत्रांतील नोकऱ्यांवर गंभीर परिणाम करू शकतो. 

हेसुद्धा वाचा : "पुढच्या 30 मिनिटात....", Zoom च्या सीईओंनी एकाचवेळी 1300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं

अद्यापही या तंत्रज्ञानामध्ये अनेक गोष्टींबाबत उणिवा असून, त्यावरही वेगानं काम सुरु आहे. हे काम पूर्ण होताच इंटरनेट सर्चच्या (Internet Search) माध्यमातून योग्य माहिती पुरवणाऱ्या या अॅपला वापर अनेक कंपन्यांमध्ये मुख्य प्रवाहात येणार आहे. ज्यामुळं असंख्य आंतरराष्ट्रीय नोकरदार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकतात अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

माणसाची जागा घेणार तंत्रज्ञान... 

सोप्या शब्दांत म्हणावं तर हे विविध अॅप्स (Apps) अनेक ठिकाणांवर नोकरीच्या ठिकाणी माणसांची जागा घेणार आहे. ते करत असणारं प्रत्येक काम ही Technology करणार आहे. त्यामुळं येत्या काळात नोकऱ्या गमावणाऱ्यांची संख्या वाढेल अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे जावो, पण मानवी बुद्धिचातुर्यावर मात करणंही एका मर्यादेनंतर अशक्यच होतं. त्यामुळं मानवी कौशल्य तंत्रज्ञानालाही मागे टाकेल या तोडीस तोड असावं हीच काळाची गरज असणार आहे हे नाकारता येत नाही.