सिग्नल सुटल्यानंतही सतत हॉर्न वाजवणाऱ्याला तरुणानं असा शिकवला धडा, पाहा व्हिडीओ

सिग्नलवर चुकूनही सतत हॉर्न वाजवू नका, या तरुणाने काय शिक्षा दिली एकदा पाहा व्हिडीओ

Updated: Sep 18, 2021, 11:02 PM IST
सिग्नल सुटल्यानंतही सतत हॉर्न वाजवणाऱ्याला तरुणानं असा शिकवला धडा, पाहा व्हिडीओ title=

वॉशिंग्टन: सिग्नलवर बऱ्याचदा हॉर्न वाजवण्याची सवय असते. सिग्नल असेल तरी हॉर्न आणि सुटायला आला तरी सतत हॉर्न वाजवला जातो. अशा लोकांना बऱ्याचदा आपण ओरडतो किंवा इग्नोर करतो. बऱ्याचदा सांगूनही असे लोक हॉर्न वाजवतात. एका तरुणानं सतत हॉर्न वाजवणाऱ्याला चांगलीच अद्दल घडवली आहे. हा सगळा प्रकार सिग्नलवर घडला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ट्रक चालक सतत हॉर्न वाजवत असल्याचं पाहून ट्रकपुढे असलेला कार चालक आपल्या गाडीतून उतरतो आणि सिग्नलवरच नाचायला सुरुवात करतो. @bcheungz नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा तरुण रस्त्यावर वेगवेगळ्या डान्स मूव्ह्स करायला सुरुवात करतो. हा सगळा प्रकार पाहून सिग्नलवर लोक हसू लागतात. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सतत हॉर्न वाजवणाऱ्या या ट्रकसमोर तरुण डान्स करताना व्हिडीओ समोर आला आहे. सिन्गल ग्रीन होऊनही हा हॉर्न वाजवत असल्याने या तरुणाने ट्रक चालकाला अद्दल घडवली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला लोकांनी खूप चांगली पसंती दिली आहे. याशिवाय अनेक कमेंट्स केल्य़ा आहेत. काहींनी तर या व्हिडीओला वेगवेगळी म्यूझिक अॅड केली आहे. हा व्हिडीओ अमेरिकेतील असल्याची माहिती मिळाली आहे.