नऊ वर्षीय मुलीच्या निधनाने या कुटुंबाने सुरू केलंय हे खास अभियान

विशिष्ट अ‍ॅलर्जीमुळे नऊ वर्षांची मुलगी टिक्कू कुटुंबीयांनी गमवली आहे.

Updated: Oct 22, 2017, 04:13 PM IST
नऊ वर्षीय मुलीच्या निधनाने या कुटुंबाने सुरू केलंय हे खास अभियान title=

लंडन  : विशिष्ट अ‍ॅलर्जीमुळे नऊ वर्षांची मुलगी टिक्कू कुटुंबीयांनी गमवली आहे.

लंडनस्थित एका भारतीय वंशाच्या दांपत्त्याने मुलीच्या अकस्मात निधनानंतर अ‍ॅलर्जीच्या विरोधात खास अभियान सुरू केले आहे. 

काही दिवसांपूर्वी दूग्धजन्य पदार्थ आणि ब्लॅकबेरीजची अ‍ॅलर्जी असलेल्या नऊ वर्षांच्या मुलीचा अकस्मिक निधन झाले होते. नयनिकाच्या नावानेच  म्हणजे 'द नयनिका टिक्कु मेमोरियल ट्रस्ट' ची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारा अ‍ॅलर्जीचे कारण आणि त्यावरील उपचार शोधण्याला चालना दिली जाणार आहे. तसेच अ‍ॅलर्जीबाबत समाजात जनजागृती करण्याचे महत्त्वाचे काम ही ट्रस्ट करणार आहे. 
लंडनमध्ये या ट्रस्टची स्थापना करण्यात आली असली तरीही भारतासह जगभरात काम केले जाणार आहे. 

कसा झाला नयनिकाचा मृत्यू ? 

नयनिकाला लहानपणापासून दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्याची अ‍ॅलर्जी होती. पण तिला पॅनकेक खाण्याची इच्छा होती. त्यानुसार साहित्य आणले. पण पहिलाच तुकडा खाल्ल्यानंतर तिला त्रास होण्यास सुरूवात झाली. सहा दिवस नयनिका लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती. मात्र डॉक्टर तिला वाचवू शकले नाही. 

पॅनकेकचे पीठ दूधजन्य पदार्थ विरहीत असले तरीही त्यामध्ये काही घटक भेसळयुक्त असू शकतात. किंवा त्यामधील केमिकल्स आणि एन्झाईम्स त्रासदायक ठरल्याची अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.