इस्रायल ऑपरेशन : लेबेनॉनसह गाझा पट्टीत दहशतवादी तळावर 20 क्षेपणास्त्र डागली, लढाऊ विमानांचा वापर

 Israel strikes in lebanon and Gaza :  दक्षिण लेबेनॉनमधून इस्त्रायलवर झालेल्या रॉकेट माऱ्यानंतर इस्रायलने रॉकेट हल्ला करत कारवाई सुरु केली आहे. गेल्या 17 वर्षातला इस्रायलचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. इस्रायलने आपल्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने 20 क्षेपणास्र डागली.  

सुरेंद्र गांगण | Updated: Apr 7, 2023, 09:19 AM IST
इस्रायल ऑपरेशन : लेबेनॉनसह गाझा पट्टीत दहशतवादी तळावर 20 क्षेपणास्त्र डागली, लढाऊ विमानांचा वापर   title=

 Israel strikes in lebanon and Gaza : इस्त्रायलने लेबेनॉन आणि गाझा पट्टीवर जोरदार हवाई हल्ला केला आहे. दक्षिण लेबेनॉनमधून इस्त्रायलवर झालेल्या रॉकेट माऱ्यानंतर इस्रायलने ही कारवाई सुरु केली आहे. गेल्या 17 वर्षातला इस्रायलचा हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. इस्रायलने या हल्ल्यांना 'ऑपरेशन द स्ट्राँग हँड' असे नाव दिले आहे. 'हमास'ला रॉकेट हल्ला करण्यासाठी जमिनीचा वापर करुन दिल्याचा आरोप इस्रायलने लेबेनॉनवर केला आहे. लेबेनॉन आणि गाझा पट्टीत क्षेपणास्त्र डागण्यात आली. इस्रायलने आपल्या लढाऊ विमानांच्या सहाय्याने 20 क्षेपणास्र डागली. हल्ल्यात दक्षिण लेबेनॉनमधील दहशतवादी तळ उध्वस्त झाल्याचा दावा इस्रायलने केलाय. 

लेबनॉनमधून इस्रायलवर 34 रॉकेटचा मारा; PM म्हणाले आता 'आर या पार' लढाई

इस्रायल पोलिसांनी जेरुसलेमधील 'अल अक्सा मशिदी'वर सलग दोन रात्री केलेल्या कारवाईमुळे सध्याचा तणाव निर्माण झाला आहे. मात्र लेबेनॉनमधून हमासने रॉकेट डागल्याचा इस्रायलचा आरोप हमासने फेटाळला आहे. दक्षिण लेबेनॉनमधून कोणी रॉकेट मारा केला आपल्याला माहिती नाही असं हमासने म्हटले आहे. विशेष म्हणजे लेबेनॉनवर इस्रायलने मारा सुरु केला तेव्हा हमासचा प्रमुख इस्माईल हनियेह हा लेबेनॉनमध्येच होता. या हल्ल्यानंतर पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटनांनी तातडीने दक्षिण इस्रायलवर नव्याने रॉकेट मारा सुरु केला.  या हल्ल्यात लेबेनॉनचे मोठे नुकसान झाले आहे.  तसेच गाझा पट्टीत दहशतवादी तळावर हल्ला चढविण्यात आला आहे.

गाझा पट्टीत रात्री तीन स्फोटांचे आवाज 

इस्रायली सैन्याकडून जोरदार रॉकेट हल्ल्यांसाठी पॅलेस्टिनी गटाला जबाबदार धरलेय. लेबनॉनच्या हद्दीतून इस्रायलवर 20 रॉकेट डागण्यात आल्याचे लष्कराने एका निवेदनात म्हटलेय. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार 25 रॉकेट हवेत डागलीत. या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आता आर या पारच्या लढाईसाठी सज्ज रहा, असे म्हटले. त्यानंतर लगेच  कारवाईला सुरुवात झाली. इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले सुरु केलेत.  गाझा पट्टीच्या परिसरात रात्री 11.15 वाजता तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले.  ज्यूंच्या सुट्टीच्या दिवशी इस्रायलवर 34 रॉकेट डागण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील 2006 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच इतके रॉकेट डागले गेले आहेत.