इस्त्राईलने हमासची पाणबूडी उडवली, इस्राईल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुमद्रातही

 लढाईत वापरल्या जाणाऱ्या या पाणबुड्या खूपच स्वस्त आहेत आणि 30 किमीच्या अंतरापर्यंत अचूक निशाणा साधू शकतात.

Updated: May 18, 2021, 09:45 PM IST
इस्त्राईलने हमासची पाणबूडी उडवली, इस्राईल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुमद्रातही title=

इस्राईल : इस्राईल आणि पॅलेस्टाईनचा अतिरेकी गट हमास यांच्यातील भांडणांनी आता एक नवीन वळण घेतले आहे. सुरवातील दोन्ही बाजूंनी हवाई आणि जमीनीवर लढाई सुरु होती. परंतु आता ही लढाई पाण्यात देखील सुरू झाली आहे. इस्त्राईल सैन्याने असा दावा केला आहे की, हमासने समुद्री मार्गाने त्यांच्या सतर्क सैन्यावर रिमोटद्वारे चालणार्‍या पाणबुडीचा वापर करून हल्ला केला आहे. इस्त्रायली नौदलाने हा दावा केला आहे की, हमासच्या निशाण्यावर इस्त्राईली जहाज आहेत. परंतु या लढाईत हमासच्या अनेक सदस्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्याची पाणबुडीही नष्ट झाली आहे. या पाणबुडीला हमासने गाझामधून लाँन्च केलं आहे.

इस्त्राईलल मीडियाच्या म्हणण्यानुसार, ही पाणबुडी रिमोट कंट्रोलने चालविली गेली जेणेकरून अचूक हल्ला होऊ शकेल. लढाईत वापरल्या जाणाऱ्या या पाणबुड्या खूपच स्वस्त आहेत आणि 30 किमीच्या अंतरापर्यंत अचूक निशाणा साधू शकतात. अशा परिस्थितीत गाझामध्ये इस्राईलचे भयंकर हल्ले अजूनही सुरूच आहेत.

मंगळवारी सकाळी इस्त्राईल विमानांनी हमासच्या ठिकाणांवर बॉम्ब आणि मिसाईल सोडल्या. दरम्यान, इस्त्राईल लष्कराने म्हटले आहे की, हमासने आतापर्यंत 3 हजाराहून अधिक रॉकेट सोडले आहेत, तर इस्त्राईलने ही गाझामध्ये हमासच्या 800 हून अधिक ठिकाणांना टारगेट केले आहे.

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेले युद्ध आता दुसर्‍या आठवड्यात पोहोचले आहे. दोन्ही बाजूंच्या या संघर्षात आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील 212 लोकं मारली गेली आहे. यामध्ये 61 लहान मुलांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 1500 पॅलेस्टाईन नागरिक जखमी झाले आहेत. तर इस्राईलमध्ये हमास रॉकेट हल्ल्यात दोन मुलांसह 10 जण ठार झाले आहेत.

दुसरीकडे, इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धात आता लेबनॉनेही उडी घेतली आहे. इस्त्राईल लष्कराने निवेदन जारी केले आहे की, लेबनॉन वरून 6 रॉकेट चालविण्यात आले आहेत. परंतु हे सर्व रॉकेट लेबनॉनच्या हद्दीतच पडले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्रायली लोकांनीही तोफा तयार केल्या आणि लेबनॉनमधील अतिरेक्यांच्या ठिकाणावर निशाणा साधला.

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्‍याहू यांनी जाहीर केले आहे की, हमासविरूद्ध भयंकर हल्ले सुरूच राहतील. देशातील सर्व लोकांची सुरक्षा आणि शांतता परत येईपर्यंत हमास विरोधात कारवाई सुरूच राहील. त्यांनी सांगितले की, इस्त्राईली सैन्य या लढाईत यशस्वी ठरले असून इस्लामिक जिहादचा कमांडर मारला गेला आहे.

नेतान्याहू यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा जगभरातून या दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन केले जात आहे. सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी, बायडन यांनी युद्धाला थांबवण्याच्या जगाच्या आवाहानाला पाठिंबा दर्शविला. याचा सरळ अर्थ असा आहे ही, हमासबरोबर इस्त्राईलचे वैमनस्य संपवावी अशी अमेरिकेचीही इच्छा आहे.