नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते फिलीस्तीनला पोहोचले. फिलीस्तीनच्या राष्ट्रध्यक्षांची पीएम मोदींना फिलीस्तीनचं ग्रँड कॉलर प्रदान करत त्यांचा सन्मान केला.
फिलीस्तीनचा दौरा करणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. या दौऱ्याला त्यामुळे ऐतिहासिक रुप आलं आहे. दौऱ्यात पीएम 'परस्पर हित संबंधांवर चर्चा करतील. दोन्ही देशांमध्ये करारांवर देखील चर्चा होईल. यानंतर दोन्ही देशाचे नेते संयुक्त प्रेस कॉन्फ्रेंस करतील.
Prime Minister Narendra Modi arrives in Palestine's Ramallah. pic.twitter.com/ePZO7tmEGn
— ANI (@ANI) February 10, 2018
मोदींनी जॉर्डन ते फिलीस्तीनचा प्रवास चॉपरने केला. या दरम्यान रॉयल जॉर्डन चॉपर्स आणि इस्राईलचे चॉपर्स त्यांना एस्कॉर्ट करत होते. मोदींच्या पहिल्या फिलीस्तीन दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कडक ठेवण्यात आली आहे. हवाई सुरक्षेसाठी जॉर्डन आणि इस्राईलचे चॉपर देखील त्यांच्यासोबत होते.
#WATCH Earlier visuals from Prime Minister Narendra Modi's journey to Palestine's Ramallah via a chopper, which was escorted by Royal Jordanian choppers by the King and Israeli choppers pic.twitter.com/ginxPzBTnV
— ANI (@ANI) February 10, 2018