नवाज शरीफ, मरियम यांची तुरुंगातून होणार सुटका, शिक्षाच रद्द

भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियन, जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांच्या सुटकेचे आदेश इस्लामाबाद न्यायालयाने दिले आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 19, 2018, 05:19 PM IST
नवाज शरीफ, मरियम यांची तुरुंगातून होणार सुटका, शिक्षाच रद्द title=

इस्लामाबाद : भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियन, जावई कॅप्टन मोहम्मद सफदर यांच्या सुटकेचे आदेश इस्लामाबाद न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाने त्यांची शिक्षा रद्द केली आहे. याबाबतचे वृत्त पाकिस्तानचे प्रमुख न्यूज चॅनेल जीओने दिलेय. न्यायालयाच्या आदेशामुळे शरीफ आता तुरुंगातून बाहेर पडणार आहेत.

दहा वर्षांची शिक्षा झालेले शरीफ यांच्यासोबत त्यांची मुलगी मरियम आणि जावई निवृत्त कॅप्टन एम. सफदर यांना भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. न्यायालयाने शरीफ यांची शिक्षाच रद्द केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. 

भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाने शरीफ यांना दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती तसेच ८० लाख पौंड दंडही ठोठावला होता. शरीफ यांची मुलगी मरियम यांना सात वर्षांची तर जावई सफदर यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली होती.

कुलसुम के अंतिम संस्कार में शामिल होने के लिए नवाज शरीफ और उनकी बेटी को मिली पैरोल, लाहौर पहुंचे

इस्लामाबाद न्यायालयाने बुधवारी पंतप्रधान नवाज शरीफ, मरियम शरीफ आणि एम. सफदर यांना ठोठावलेल्या शिक्षांचा निर्णय रद्द केला आहे. तसेच या प्रकरणात पाकिस्तान मुस्लीम लीगच्या दोन नेत्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.