'या' देशात एकाच दिवशी २१ लोकांना दिली फाशी

दहशतवादी कृत्यामुळे मिळाली फाशी 

Updated: Nov 17, 2020, 12:31 PM IST
 'या' देशात एकाच दिवशी २१ लोकांना दिली फाशी  title=

मुंबई : इराकमध्ये दहशतवाद विरोधी कायद्यानुसार दोषी ठरवण्यात आलेल्या २१ लोकांना सोमवारी एकाचवेळी फाशी देण्यात आली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात फाशी देण्यात आली. या घटनेमुळे मानवाधिकार संघटनेकडून इराक सरकारला विरोध केला आहे. इराकमधील प्रसिद्ध नासिरियाह जेलमध्ये फाशी देण्यात आली. 

दहशतवाद्यांच्या आरोपांची माहिती नाही 

इराकच्या नासीरीयाह तुरुंगात २००५ मध्ये दहशतवाद विरोधी कायद्यानुसार दोषी ठरविल्या गेलेल्या २१ जणांना सोमवारी फाशी दिली गेली मात्र त्यांनी कोणती दहशतवादी कृत्ये केली होती त्याचा तपशील दिला गेलेला नाही. विशेष म्हणजे या एकच जेल मध्ये फाशीची शिक्षा सुनावले गेलेले दोषी ठेवले जातात. सद्दाम हुसेन यांची सत्ता असताना शेकडो लोकांना व माजी अधिकाऱ्यांना येथे फासावर लटकविले गेले होते. या देशात फाशीची शिक्षा देण्यास मंजुरी आहे.

फाशीकरता एकमात्र कारागृह

धी क्वर प्रांतात असलेल्यानासीरीयाह कारागृहात फाशी देण्यात आली. इराकमध्ये हे एकमेव कारागृह आहे जेथे फाशी घोषित झालेल्या आरोपींना ठेवले जाते. सद्दाम हुसेन शासनातील माजी अधिकाऱ्यांना याच कारागृहात फाशी देण्यात आली. 

राष्ट्रपतींची मंजूरी महत्वाची 

इराकमध्ये फाशीची शिक्षा ही सामान्य आहे. अनेकदा विरोध दर्शवूनही सरकारने फाशीची शिक्षा रद्द केलेली नाही. २०१७ च्या शेवटी इस्लामिक स्टेट म्हणजे आयएसआयएस (इसीस)ने इराकवर विजय मिळविल्यावर जिहादी समूहाने त्यांच्यावर निष्ठा व्यक्त केली होती आणि त्यानंतर शेकडो नागरिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. मात्र फाशी देण्यास राष्ट्रपतीची मंजुरी लागते त्यामुळे त्यातील काही जणांनाच फाशी दिले गेले होते. सोमवारी फाशी दिल्या गेलेल्या २१ जणांच्या शिक्षा अमलबजावणीला राष्ट्रपती बरहाम सालीह यांनी मंजुरी दिली होती असे समजते.