आंतरराष्ट्रीय बातम्या । जर्मनी, दक्षिण आफ्रिका, जपानमधील घडामोडी

दक्षिण आफ्रिकेचे माजी आणि दिवंगत अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे वकिल जॉर्ज बायजोस यांचे निधन झाले आहे.

Updated: Sep 10, 2020, 09:12 PM IST
आंतरराष्ट्रीय बातम्या । जर्मनी, दक्षिण आफ्रिका, जपानमधील घडामोडी  title=

लंडन : दक्षिण आफ्रिकेचे माजी आणि दिवंगत अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचे वकिल जॉर्ज बायजोस यांचे निधन झाले आहे. ते ९२ वर्षांचे होते. नेल्सन मंडेलांच्या अनेक चळवळींमधल्या खटल्यांपैकी १९६४मधल्या एका खटल्यात त्यांना फाशीची शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र जॉर्ज यांच्या युक्तीवादामुळे मंडेलांची फाशी टळली होती. त्यांनी मंडेलांची वकिली केली होती. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही.

कोरोनानंतर स्वाईन फिव्हरची साथ 

कोरोनाकाळात आता जर्मनीची डोकेदुखी आणखी वाढत आहे. स्वाईन फिव्हर तापाची साथ हळूहळू डोके वर काढण्याची शक्यता आहे. रानटी डुकरामध्ये या तापाची लक्षणे आढळून येतात. सध्या तरी एकाच रानटी डुकरात याची लक्षणं आढळून आल्याचे जर्मनीच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले आहे. पण यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. योग्य ती काळजी घेण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे.

शिंजो आबे यांच्या राजीनाम्यानंतर...

जपानमध्ये सध्या बऱ्याच राजकिय घडामोडी घडत आहेत. याअंतर्गत जपानच्या नव्या विरोधी पक्षाने आपला नेता निवडला. सीडीपीजे आणि डीपीपी या पक्षांनी युती करत युकियो इदानो यांची विरोधी नेतेपदी निवड केलीय. इदानोंनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. शिंजो आबे यांच्या राजीनाम्यानंतर संसदेच्या कनिष्ठ सभागृहासाठी पुढील महिन्यात निवडणुकांची शक्यता वर्तवली जात आहे.

दक्षिण कोरियात आपात्कालीन अर्थसंकल्प

दक्षिण कोरियामध्ये सध्या आपात्कालीन अर्थसंकल्पाची घोषणा करण्यात आली. सेऊलमध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीत अध्यक्ष मून जाई-इन यांनी ही घोषणा केलीय. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेळा खिळ बसत असल्यामुळे सरकारने ७ लाख कोटी डॉलरचा पुरवणी अर्थसंकल्प तयार केलाय.याअंतर्गत कोरोनामुळे उद्ध्वस्त झालेले उद्योगधंदे आणि छोटे व्यापारी यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.