या देशात महागाईची मार, चहापावडर 5100 रुपये किलो, तर शॅम्पूही 14 हजाराला

बापरे! इथे इंधन सोडाच चहापावडरलाच सोन्याचा भाव, शॅम्पूही 14 हजाराला

Updated: Oct 28, 2021, 04:50 PM IST
या देशात महागाईची मार, चहापावडर 5100 रुपये किलो, तर  शॅम्पूही 14 हजाराला title=

प्योंगयांग: भारतात इंधन आणि तेलाचे दर वाढले आहेत. दुसरीकडे महागाईमुळे सर्वसामन्यांचं कंबरडं मोडलं आहे. खांद्यतेलच नाही तर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. मात्र एका प्रांतात चक्क जीवनावश्यक वस्तूंचे दर 1 ग्रॅम सोन्याच्या किंमतीएवढे महागले आहेत. उत्तर कोरियामध्ये गेल्या काही वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे.  नॉर्थ कोरियाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

नॉर्थ कोरियामध्ये एका अहवालानुसार केवळ 2 महिना पुरेल एवढाच धान्यसाठा उपलब्ध आहे. तिथे अशी परिस्थिती ओढवल्यामुळे आता नागरिकांची चिंताही वाढली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष किंम जोंग उन यांनाही ही गोष्ट कळून चुकली आहे की तिथले लोक एक एक दाण्यासाठी तडफडत आहेत. तिथल्या लोकांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत.

उत्तर कोरियातील अन्न-पुरवठ्याचं संकट ओढवलं आहे. सोयाबिन तेल, पीठ आणि एक किलो मक्यासाठी नागरिकांना 3137 वॉन मोजावे लागत आहेत. रुपयाचा विचार करायचा झाला तर प्रत्येकी दोनशे रुपये किलोनुसार नागरिकांना या गोष्टी विकत घ्याव्या लागत आहेत. जून 2021 पासून या प्रांतात महागाईला सुरुवात झाली. आजच्या मितीला इथे महागाईची मार आहे.

नॉर्थ कोरियामध्ये काय आहेत भाव
कॉफी- 7300 रुपये प्रति किलो
चहापावडर-  5100 रुपये प्रति किलो
शाम्पू- 14000 रुपये प्रति किलो
मक्याचे दर- 204 रुपये प्रति किलो
केळ्याचे दर- 3300 रुपये प्रति किलो
 
कोरोना आणि बदलणाऱ्या हवामानामुळे पिकांचं झालेलं नुकसान अशी दोन कारणं आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना महागाईचा फटका बसणार आहे. या देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागला. त्यानंतर खराब हवामानामुळे पिकांचंही नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.