या देशात महागाईचा भडका, चहापत्ती 5100 रुपये तर केळी 3300 रुपये किलो

देशात फक्त 2 महिन्यांचे अन्न शिल्लक आहे. 

Updated: Oct 28, 2021, 03:51 PM IST
या देशात महागाईचा भडका, चहापत्ती 5100 रुपये तर केळी 3300 रुपये किलो title=

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर कोरियामध्ये अन्न संकट ही एक सामान्य गोष्ट बनली असली तरी सध्या उत्तर कोरियाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. एका अहवालानुसार, देशात फक्त 2 महिन्यांचे अन्न शिल्लक आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, उत्तर कोरियातील लोक धान्यासाठी तळमळत आहेत, हे खुद्द किम जोंग उन यांनाच मान्य करावे लागले आहे.

किम जोंग उन यांचा कमी खाण्याचा आदेश

उत्तर कोरियातील अन्न संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन हुकूमशहा किम जोंग उन यांनी लोकांना कमी खाण्याचे आदेश दिले आहेत. किम जोंग यांनी देशवासियांना 2025 पर्यंत कमी अन्न खाण्यास सांगितले आहे जेणेकरून देश अन्न संकटातून बाहेर पडू शकेल.

उत्तर कोरियात महागाई गगनाला भिडली

उत्तर कोरियामध्ये साखर, सोयाबीन तेल आणि पीठाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. उत्तर कोरियामध्ये एक किलो मक्याचा भाव 3137 वोनवर पोहोचला आहे. हे दोनशे रुपये प्रति किलो इतके आहे. जून 2021 मध्ये उत्तर कोरियामध्ये किंमती वाढू लागल्या, ज्या आता गगनाला भिडल्या आहेत.

उत्तर कोरियात महागाईचा भडका

कॉफी - 7300 रुपये प्रति किलो
चहापत्ती - 5100 रुपये प्रति किलो
शाम्पूची बाटली - 14000 रुपये
मका - 204 रुपये प्रति किलो
केळी - 3300 रुपये प्रति किलो