कृषि क्षेत्रात पाकिस्तानची वाट?, महागाईचा आगडोंब उसळला

पाकिस्तानला कृषि उत्पन्न कमी झाल्याचा मोठा फटका बसल्याचा अंदाज आहे. हा फटका कृषि क्षेत्रामुळेच बसला आहे किंवा यामागे चुकीच्या आर्थिक धोरणाचा हा फटका आहे.

Updated: Dec 31, 2019, 02:41 PM IST
कृषि क्षेत्रात पाकिस्तानची वाट?, महागाईचा आगडोंब उसळला title=

कराची : पाकिस्तानला कृषि उत्पन्न कमी झाल्याचा मोठा फटका बसल्याचा अंदाज आहे. हा फटका कृषि क्षेत्रामुळेच बसला आहे किंवा यामागे चुकीच्या आर्थिक धोरणाचा हा फटका आहे, यावर अजून कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही. मात्र जास्तच जास्त महागाई या कृषि क्षेत्राशी संबंधित मालाच्याच वाढल्या आहेत. यामुळे एकीकडे आर्थिक संकट, दुसरीकडे वाढत जाणारं कर्ज, आणि आणखी यावर महागाईचा दणका पाकिस्तानींना बसणे सुरूच आहे. 

पाकिस्तानला यावर मलमपट्टी करायला कुणीही तयार नाही. असं म्हणतात की पाकिस्तानच्या अर्ध्या लोकसंख्येला एकवेळा उपवास करावा लागेल की काय अशी स्थिती आहे.

डाळीचे भाव तुम्ही ऐकले तर तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही. पाकिस्तानात मुगडाळ 260 रूपये किलोवर आली आहे. पाकिस्तानचं वृत्तपत्र डॉनने दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानात डाळीचे भाव एवढे कधीच वाढले नाहीत.

एक किलो टॉमेटोचा भाव पाकिस्तानात 400 ते 425 रूपये किलोवर गेला आहे. साखर 75 रूपये किलोच्याही पुढे गेली आहे. यावरून पाकिस्तानात ऊस शेतीला फटका बसल्याचा अंदाज आहे. 

पाकिस्तानात ही जी भाववाढ झाली आहे, ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने अन्नाचा एक एक कण अशा जनतेसाठी आता महत्त्वाचा ठरणार आहे. दुध-दही, भाजीपाला, पेट्रोलडिझेल सर्वच वस्तुंच्या किंमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. 9 वर्षात पाकिस्तानात पहिल्यांदा एवढी महागाई वाढली आहे.