नवी दिल्ली : भारत लोकसंख्येच्या बाबतीत काही दिवसांमध्ये चीनला देखील मागे टाकणार आहे. 2024 मध्ये चीन पेक्षा भारताची लोकसंख्या अधिक असेल. २०३० मध्ये भारताची लोकसंख्या 1.5 अब्ज होणार आहे. संयुक्त राष्ट्र (यूएन) ने ही शक्यता वर्तवली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाने बुधवारी २५ वा अहवाल सादर केला. चीनची लोकसंख्या सध्या 1.41 अब्ज आणि भारताची लोकसंख्या 1.34 अब्ज आहे. दोन्ही देशांची जागतिक लोकसंख्या ही अनुक्रमे १९ आणि १८ टक्के आहे. २०२२ मध्ये भारताची लोकसंख्या चीनच्या लोकसंख्येला मागे टाकू शकते.
एका नवीन अहवालानुसार अंदाजे 2024 मध्ये भारताची आणि चीनची लोकसंख्या सुमारे 1.44 अब्ज असेल, भारताची लोकसंख्या २०३० मध्ये १.५ अब्ज आणि २०५० मध्ये 1.66 अब्ज असेल. पण भारताच्या तुलनेत 2030 मध्ये चीनची लोकसंख्या स्थिर असेल, असा अंदाज आहे.