Lottery Jackpot: 2 हजार रुपयांच्या लॉटरीवर लागला कोट्यवधींचा जॅकपॉट

2 हजार रुपयांच्या लॉटरीने कुटुंबाला केलं मालामाल, 28 कोटींचं घर घेतल्यानंतरही...   

Updated: Oct 15, 2022, 03:44 PM IST
Lottery Jackpot: 2 हजार रुपयांच्या लॉटरीवर लागला कोट्यवधींचा जॅकपॉट title=

Lottery Jackpot : कोणाचं नशीब कधी बदलेल सांगता येत नाही. जो श्रीमंत असेल तो अधिक श्रीमंत होतो, तर कही मध्यम वर्गीय व्यक्ती देखील श्रीमंत होवू शकतो. असंच काही एक व्यक्तीसोबत झालं आहे. लीसेस्टरशायर (UK) येथे राहणाऱ्या 58 वर्षीय उत्तम परमार यांच्यासोबत असं घडले. लकी ड्रॉमध्ये त्यांनी 2 हजार रुपयांची लॉटरी (lottery in britain) लावली आणि तब्बल 28 कोटी रुपयांचं आलिशान घर जिंकलं आहे, पण आता तो 56 दिवसांनंतर भव्य घर 37 कोटी रुपयांना विकणार आहे. म्हणजेच परमारला 9 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. (indian man won lottery in britain)

रिपोर्टनुसार, 58 वर्षीय उत्तम परमार पत्नी रॉकी आणि मुलगा आरोनसोबत लीसेस्टरशायर (UK) येथे राहतात. त्यांनी जुलैमध्ये 'ओमेझ मिलियन पाउंड हाउस ड्रॉ' अंतर्गत 4 बेडरूम असलेलं घर जिंकलं आहे. सुरुवातीला उत्तम परमान यांनी एवढी मोठी लॉटरी लागली यावर विश्वासच बसत नव्हता. 

अखेर ओमाझेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी येऊन याबाबत माहिती दिली असता, त्यांची खात्री पटली. उत्तम यांनी जिंकलेलं घर कॉर्नवॉल, यूके येथे आहे. 4200 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले हे घर अनेक आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे, घरात बाथटब आहे आणि बाहेरून नयनरम्य दृश्य देखील दिसतं. 

उत्तम यांनी याआधीही अनेकदा या लकी ड्रॉमध्ये नशीब आजमावलं होतं, पण नशिबाने त्यांना साथ दिली नाही. पण आता त्यांचं आणि कुटुंबाचं भाग्य चमकलं आहे. 

'द सन'च्या वृत्तानुसार, उत्तम परमार यांनी ही मालमत्ता विकली नाही तरी त्यांना महिन्याला 14-15 लाख रुपये मिळू शकतात. ही मालमत्ता भाड्याने देऊन ते महिन्याला जवळपास 14-15 रुपये कमावू शकतात. हे घर ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण खूप मागणी असलेला आणि पॉश एरिया आहे.