PNB Scam: फरार Mehul Choksi च्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न, डोमिनिकाला पोहचलं खासगी विमान

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला भारतात आणण्याचे प्रयत्न

Updated: May 30, 2021, 03:12 PM IST
PNB Scam: फरार Mehul Choksi च्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न, डोमिनिकाला पोहचलं खासगी विमान title=

नवी दिल्ली : पीएनबी घोटाळ्यातील (PNB Scam) आरोपी आणि फरार डायमंड व्यापारी मेहुल चोकसी (Mehul Choksi) यांना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न तीव्र झाले आहेत. एक खासगी विमान भारतातून डोमिनिका येथे दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. 

एंटीगुआचे पंतप्रधान गॅस्टन ब्राउन यांनी याची पुष्टी केली असून ते म्हणाले की, डोमिनिका (Dominica)च्या डगलस-चार्ल्स विमानतळावर Douglas-Charles Airport)भारतीय खासगी विमान आहे.

भारतातून पाठविली कागदपत्रे

मीडिया रिपोर्ट्सनुसार हे जेट नवी दिल्ली येथून मॅड्रिडमार्गे डोमिनिका येथे दाखल झालं. ब्राउन यांनी म्हटलं की, भारत सरकारने कागदपत्र पाठवले आहेत. जो पुरावा आहे की, मेहुल चोकसी हा फरार आहे. बुधवारी कोर्टात ते सादर केले जातील. भारत सरकार चोकसीचया प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील सांगितलं. भारतीय अधिकाऱ्यांनी मात्र यावर काहीही माहिती दिलेली नाही.

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी (Mehul Choksi) डोमिनिका (Dominica) च्या जेलमध्ये बंद आहे. त्याचे काही फोटो समोर आले आहेत.