ह्युस्टन : अमेरिकेतील टेक्सास प्रातांत एका तीन वर्षाच्या भारतीय मुलीला दूध पित नसल्यामुळे वडिलांनी घराबाहेर उभे राहण्याची शिक्षा दिली. मात्र त्यानंतर ती मुलगी बेपत्ता झाली. शेरिन मैथ्यूज हिला वेसले मैथ्यूज यांनी भारतातील एका अनाथाश्रमातून दत्तक घेतले होते. ‘एनबीसी’ च्या वृत्तानुसार शेरिन शनिवारी ७ ऑक्टोबरला सकाळी तीन वाजल्यापासून बेपत्ता आहे. अधिकारी केविन परलिच यांनी सांगितले की, वेसले यांना पोलिसांनी अटक केलीय आहे. मात्र २५०,००० डॉलर च्या जामिनावर सोडण्यात आले आहे.
शेरिन हिला तिच्या वडिलांनी रात्री दूध पिण्यास सांगितले. मात्र तिने दूध पूर्ण संपवले नाही. त्यानंतर वडीलांनी तिला घराबाहेर उभे राहण्याची शिक्षा केली. तिला बाहेर उभे केल्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी तिच्या वडिलांनी बाहेर पाहिले तर ती तिकडे नव्हती. पोलिसांनी सांगितले की, "मुलगी बेपत्ता झाल्यानंतर वडिलांनी सुमारे पाच तास पोलिसानांकडे तक्रार केली नाही. त्यामुळे हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे."