भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? 'खऱ्या व्हिलन'ने काय केलंय पाहा

India vs Canada Main Villain Is This Women: भारत आणि कॅनडामधील संघर्ष शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी मायदेशी जाण्याचे निर्देश दिले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 20, 2023, 02:22 PM IST
भारत-कॅनडात संघर्षाची काडी टाकणारी महिला कोण? 'खऱ्या व्हिलन'ने काय केलंय पाहा title=
दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत

India vs Canada Main Villain Is This Women: खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडियन संसदेमध्ये केलेल्या विधानामुळे हा संघर्ष टोकाला गेला असून भारताचा या हत्येत सहभाग असल्याचा आरोप ट्रूडो यांनी केला आहे. मात्र या हत्येशी आपला काहीही संबंध नसल्याचं म्हटलं असून कॅनडियन राजदूतांना 5 दिवसात देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. ट्रूडो यांनी सोमवारी संसदेमध्ये भाष्य करताना हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाल्याचा दावा केला. यानंतर त्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तातडीने भारतात परत पाठवलं. यावरुनच आता दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष सुरु झाला आहे.

नक्की वाचा >> कॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, 'जम्मू-काश्मीरमध्ये...'

कॅनडा आणि भारत संघर्षातील खलनायक कोण

मात्र अगदी मागील आठवड्यामध्ये जी-20 निमित्त भारतात आलेले ट्रूडो आणि मित्र देश म्हणून घेणाऱ्या भारताबरोबर कॅनडाचे संबंध एवढे रसातळाला जाण्यामागे नेमकं कोण कारणीभूत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विमान खराब झाल्याने नियोजित वेळापत्रकापेक्षा भारतात 2 दिवस अधिक मुक्काम करणारे ट्रूडो हेच या सर्व संघर्षामागील खरे खलनायक आहेत की यामागे इतर कोणी आहे? ही चर्चा सुरु असतानाच दोन्ही देशांमध्ये टोकाचा संघर्ष होणाऱ्यासाठी ट्रूडोंऐवजी एक महिला जबाबदार असल्याचं सांगितलं जात आहे.

ही महिला कोण आणि तिने काय केलं?

ज्या महिलेमुळे कॅनडा आणि भारत आमने-सामने उभे ठाकले आहेत तिचं नाव आहे, जोडी थॉमस! जोडी या कॅनडामधील राजकारणामध्ये 2015 पासून अधिक सक्रीय झाल्या आहेत. 2015 मध्ये ट्रूडो पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत चालू लागले. शीख सामाजाला आपल्या राजकीय हेतूसाठी ट्रूडो यांनी जवळ केलं. शीख समुदायामधील लोकांना आपल्या पक्षासाठी जोडून ठेवण्याची जबाबदारी ट्रूडो यांनी तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा उपमंत्री जोडी थॉमस यांच्याकडे सोपवली. त्यानंतर जोडी थॉमस यांनी जस्टीन ट्रूडो सरकारला शीख समुदायाने पाठिंबा देत रहावं म्हणून खलिस्तानी दहशतवादी आणि सरकारमधील संबंध अधिक दृढ केले. 

नक्की वाचा >> 40 हजार 446 कोटींचा फटका! भारताशी पंगा घेणं कॅनडला खरंच पडणार 'महागात'

ट्रूडो यांनी दिली बढती

जोडी थॉमस या राष्ट्रीय सुरक्षा उपमंत्री होत्या. त्यांनी संपूर्ण देशामध्ये खलिस्तानी आंदोलनांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिलं. इतकेच नाही तर त्यांनी फुटीरतावाद्यांना प्रोत्साहनही दिलं. जोडी थॉमस यांच्या कामाने प्रभावित झालेल्या ट्रूडो यांनी त्यांना कॅनडाच्या मुख्य सुरक्षा सल्लागार म्हणून बढती दिली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झाल्यानंतर जोडी थॉमस अधिक आक्रमक झाल्या. त्यांनी शीख समुदायामधील फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. जोडी थॉमस यांनी याच वर्षी जून महिन्यामध्ये भारतावर गंभीर आरोप केले. भारत हा कॅनडाच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप जोडी थॉमस यांनी केला. 

नक्की वाचा >> 'त्या' खलिस्तान समर्थक Insta स्टोरीमुळे विराटने आवडत्या गायकाला केलं Unfollow; भाजपाकडून FIR ची मागणी

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनंतरही पदावर कायम

जोडी थॉमस हे कॅनडियन राजकारणामधील सर्वात वादग्रस्त व्यक्तीमत्व आहे. त्या ट्रूडो यांच्या इतक्या खास आहेत की अनेकदा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आल्यानंतरही त्यांचं स्थान आणि महत्त्व अढळ राहिलं आहे. जोडी थॉमस यांनी आपल्या मुलाला बेकायदेशीरपणे लष्कराचं कंत्राट मिळवून दिल्याचा राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील गंभीर आरोपही करण्यात आला आहे. हा सर्व कथित भ्रष्टाचार 2021 मध्ये झाल्याचं सांगण्यात आलं. जोडी थॉमस यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्या लेकाला 77 अब्ज डॉलर्सच्या युद्ध नौकांचं कंत्राट मिळवून दिल्याचं सांगितलं जातं. इतकेच नाही तर हे प्रकरण समोर आल्यानंतर चूक मान्य करण्याऐवजी जोडी थॉमस यांनी 'चोरच्या उलट्या बोंबा' म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी कॅनडामधील संरक्षण उद्योगावरच टीका केली होती.