फ्रान्सकडून भारताला पहिले राफेल लढाऊ विमान

 भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी फ्रान्समध्ये या पहिल्या विमानाची चाचणी घेतली. 

PTI | Updated: Sep 21, 2019, 08:04 AM IST
फ्रान्सकडून भारताला पहिले राफेल लढाऊ विमान title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीनला काळजीत टाकणारे राफेल हे लढाऊ विमान येत्या काही दिवसांत भारतात दाखल होत आहे. फ्रान्सने पहिले राफेल विमान भारताच्या हवाली केले आहे. भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी फ्रान्समध्ये या पहिल्या विमानाची चाचणी घेतली. 

वायुसेनेतर्फे एअरमार्शल बी. आर. चौधरी यांनी राफेलमधून भरारी घेतली. त्यानंतर सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या. पुढील महिन्यात ८ ऑक्टोबरला साजरा होत असलेल्या वायुसेना दिवशी फ्रान्स समारंभपूर्वक पहिलं राफेल भारताच्या ताब्यात देईल. या राफेलची डिलीव्हरी घेण्यासाठी स्वतः संरक्षणमंत्री राजनाथसिंह आणि वायुसेना प्रमुख बी. एस. धनुआ फ्रान्सला जाण्याची शक्यता आहे.

भारत फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करत आहे. राफेलची पहिली स्क्वॉड्रन अंबालात तैनात केली जाईल. दरम्यान, राफेल विमान खरेदी करारावरुन काँग्रेसने जोरदार टीका केली होती. या करारात मोठा घोटाळा झाल्याचे दावा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीचा मुद्दाही केला होता.