चीनला उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमध्ये तैनात केला 'भीष्म' टँक

चीनला उत्तर देण्यासाठी भारताची जोरदार तयारी

Updated: Jun 24, 2020, 06:37 PM IST
चीनला उत्तर देण्यासाठी भारताने लडाखमध्ये तैनात केला 'भीष्म' टँक title=

नवी दिल्‍ली : गलवान संघर्षानंतर भारताने लडाखमध्ये सर्वात शक्तीशाली मानला जाणारा टँक T-90 भीष्म टँक तैनात केला आहे. भीष्म हा जगातील सर्वात अचूक मारा करणारा टँक मानला जातो. लडाखमध्ये T-90 टँकची तैनाती भारत कशा प्रकारे चीनला उत्तर देण्यासाठी तयार आहे हे दाखवतो. T-90 च्या पूर्व लडाखमध्ये भारतीय लष्कराने जबरदस्त तयारी केली आहे. 

चीनसोबत सुरु असलेला तणाव वाढला आहे. चीनवर विश्वास ठेवणं घातक ठरु शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार, चीनने सीमेजवळ काही टँक आणल्याची माहिती आहे. चीनकडे T-95 टँक आहे. जो T-90 टँकच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे चीनच्या या टँकला भीष्म उत्तर देऊ शकतो. त्यामुळे भारताने हा टँक तेथे तैनात केला आहे.

वैशिष्ट्य

- भारताचा प्रमुख युद्ध टँक
- जैविक आणि रासायनिक हत्यारांचा सामना 
- हे टँक रशियाने बनवले होते.
- ६० सेकंदाच ८ गोळे फायर करु शकतो.
- टँकवर अचूक 125 एमएमची मेन गन
- ६ किमीवर मिसाईल लॉन्च करण्याची क्षमता
- ४८ टन वजन, जगातील हल्के टँकमधील एक
- दिवस आणि रात्र लढण्याची क्षमता
- मिसाईल हल्ल्याला रोखणारं कवच
- शक्तिशाली १००० हॉर्स पॉवरचं इंजिन
- ७२ किमी प्रति तासचा वेग
- एका वेळेत ५५० किमी पर्यंत हल्ला करण्यासाठी सक्षम

लडाखमध्ये का महत्त्वाचं?

1. भारत आणि चीन दरम्यान सीमा स्पष्ट नाहीत
2. भारतीय सीमेत चीनकडून घुसखोरी 
3. लडाखमध्ये सीमेवर असलेला तणाव
4. तिब्बतमध्ये चिनी सैन्याचे तैनात टँक
5. अक्साई चीनवर अवैध ताबा

भारताची रणनीती

- लडाखच्या मोकळ्या मैदानात टँक हे महत्त्वपूर्ण शस्त्र
- लडाखच्या डेमचुक आणि स्पांगूर गॅपमध्ये वाळूमय जमीन
- वाळूमय जमिनीवर हे टँक वेगाने जावू शकतात.
- चीनचा महामार्ग डेमचॉक आणि स्पांगूर गॅपपासून 50 कि.मी.
- भारतीय टँकला या महामार्गाला लक्ष्य करता येणं सोपे

भारतीय टँक विरूद्ध चिनी टँक

- टी 90 भीष्म हे जगातील सर्वात मजबूत टँक आहे
- चीनपेक्षा भारतीय सैन्याकडे अधिक टँक आहेत
- भारतीय सैन्याकडे एकूण 4292 टँक
- चायना आर्मीकडे 3500 टँक
- भारतीय सैन्यात चीनपेक्षा 800 अधिक टँक