Imran Khan’s arrest imminent : आता मोठी बातमी पाकिस्तानातून. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे समर्थक आणि पोलीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत धुमश्चक्री उडाली. तोशखाना प्रकरणी (Toshakhana Case) खान यांना अटक होऊ नये यासाठी त्यांच्या समर्थकांनी झमन पार्क घराबाहेर मोठी गर्दी केली. (Imran Khan Govt Crisis) यावेळी पोलीस आणि समर्थकांमध्ये बाचाबाची आणि झटापट झाली. त्यानंतर खान समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केली. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराची नळकांडी फोडली.
तसेच खान समर्थकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी पाण्याचे फवाऱ्याचा मारा केला. कराची, इस्लामाबाद, रावळपिंडी आणि लाहोरमध्येही इम्रान समर्थकांनी हिंसक आंदोलनं केली. दरम्यान, इम्रान खान यांनी व्हिडिओद्वारे समर्थकांशी संवाद साधलाय. मला अटक केली किंवा मी मारला गेलो तरीही लोकांनी लढा सुरूच ठेवावा, असं अवाहन इम्रान खान यांनी केलंय. हा सर्व इंग्लंड प्लान असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांचे समर्थक अधिक आक्रमक झाले आहेत. इम्रान खान समर्थक आणि पोलीस यांच्यात जोरदार बाचाबाची झाली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक कधीही होऊ शकते. इम्रानला लाहोरमध्ये अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या दोन खंडपीठाच्या न्यायालयांने इम्रानविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे त्यांना अटक निश्चित होणार असल्याने समर्थक्रम आक्रमक झालेत.
पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान इम्रान खान यांनी 14 मार्च 2023 रोजी त्यांच्या समर्थकांनी त्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांना अटक झाली तरीही संघर्ष सुरु ठेवण्यात येईल, असा समर्थकांनी इशारा दिला आहे. काही तासांनंतर इम्रान खान यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या पोलिस आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरु झाला. खान यांच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला आणि पाण्याच्या फवारे यांचा वापर केला. त्यानंतर समर्थकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने अनेक पोलीस जखमी झाले आहेत.
पाकिस्तानातील सत्तासंघर्षात इम्रान खान यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी कधीही अटक होऊ शकते, त्यामुळे त्यांचे समर्थक बिथरले आहेत. समर्थक मोठ्या संख्यने रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये राजकीय स्थिती अस्थिर झाली आहे. पोलीस आणि इम्रान खान यांच्या समर्थकांच्या राड्यामुळे समस्या गंभीर झाली आहे.