होणार हाहाकार; शहराच्या आकाराचा महाकाय ग्लेशियर तुटण्याच्या वाटेवर

ग्लेशियरला सध्या मोठ्या तडा

Updated: Dec 14, 2021, 03:50 PM IST
होणार हाहाकार; शहराच्या आकाराचा महाकाय ग्लेशियर तुटण्याच्या वाटेवर title=

वॉशिंग्टन : अंटार्क्टिकातील थ्वाईट्स (Thwaits Glacier)चा एक मोठा भाग तुटण्याची भीती सध्या वर्तवण्यात आली आहे. डूम्सडे या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या ग्लेशियरला सध्या मोठ्या तडा गेल्या आहेत. ज्यामुळं येणारं संकट हवामान तज्ज्ञांना स्पष्टपणे दिसू लागलं आहे.

येत्या काही वर्षांमध्ये या ग्लेशियरचा अमेरिकेतील फ्लोरिडा शहराच्या आकाराचा अतिप्रचंड भाग तुटणार आहे. वैज्ञानिकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार असं झाल्यास जागतिक स्तरावर समुद्राचा जलस्तर वाढणार  आहे.

जागतिक स्तरावर हा बदल झाल्यास सध्या भूभाग असणारी अनेक क्षेत्र पाण्याखाली येतील.

सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार महासागरांचं तापमान वाढल्यामुळे थ्वाईट्स ईस्टर्न आईस शेल्फ सबमरीन शोल अर्थात किनाऱ्यांपासून आपली पकड गमावत आहे. हा घटक या ग्लेशियरला उर्वरित भागाशी जोडून ठेवण्यात महत्त्वाचा ठरतो.

अमेरिकेच्या भू- भौतिकीय युनियनच्या वार्षित बैठकीत सादर करण्यात आलेल्या सॅटलाईट फोटोनुसार सदर ग्लेशियरला आलेल्या मोठ्या भेगा पाहता जर हा तरंगणारा आईस शेल्फ अर्थात अतिभव्य बर्फाचा तुकडा तुटतो तर समुद्राची पाणी पातळी 25 टक्क्यांनी वाढेल.

येत्या काळात या ग्लेशियरमध्ये होणाऱ्या प्रत्येक बदलावर हवामान तज्ज्ञांचं लक्ष असणार आहे.

संशोधक आणि अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, जागतिक तापमान वाढीमुळे थ्वाईट्स ग्लेशियर अतिशय वेगानं वितळू लागला आहे. संपूर्ण जगासाठी ही धोक्याची सूचना आहे.

हे ग्लेशियर अंटार्क्टिटाच्या पश्चिमेला असणाऱ्या समुद्राच्या खोलवर रुतलेलं आहे. सध्या यातील अनेक मोठी शिखर कोसळू लागली आहेत.

1980 पासून या ग्लेशियरमधून जवळपास 600 टन बर्फ कमी झाला आहे. आता ते वेगानं वितळू लागल्यास किनाऱ्यालगत असणाऱ्या भागांचं मोठं नुकसान होणार आहे.