ISIS ची सेक्स गुलाम असलेल्या १४ वर्षी मुलीची करूण काहणी

 महिलांवरील इसीसच्या अत्याचाराची काहणी सर्वांना माहित आहे. अनेक समुहांवर अत्याचार ही संघटना करते पण सर्वाधिक अत्याचार ते यजीदी महिलांवर करतात. महिलांना अनेक दिवस उपाशी ठेवतात, महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या यापूर्वीही तुम्ही ऐकल्या आहेत. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या अत्याचाराबद्दल ऐकले तर अंगावर काटे येतात. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 26, 2017, 05:49 PM IST
 ISIS ची सेक्स गुलाम असलेल्या १४ वर्षी मुलीची करूण काहणी  title=

नवी दिल्ली :  महिलांवरील इसीसच्या अत्याचाराची काहणी सर्वांना माहित आहे. अनेक समुहांवर अत्याचार ही संघटना करते पण सर्वाधिक अत्याचार ते यजीदी महिलांवर करतात. महिलांना अनेक दिवस उपाशी ठेवतात, महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या यापूर्वीही तुम्ही ऐकल्या आहेत. त्यांच्याकडून करण्यात आलेल्या अत्याचाराबद्दल ऐकले तर अंगावर काटे येतात. 

मीडियामध्ये आलेल्या बातम्यामध्ये सांगण्यात आल्या की आरोपी महिलांचे अपहरण करून त्याच्यावर बलात्कार करतात आणि त्यांना सेक्स स्लेव म्हणजे गुलाम बनवितात. तसेच पीडित महिलांना सीरीयाच्या बाजारात बोली लावून विकले जाते. वेळोवेळी इस्लामिक स्टेट यजीदी महिलांवर अत्याचाराच्या बातम्या येत असतात. आता पुन्हा एक यजीदी मुलगी इखलासने बीबीसीला मुलाखत दिली. इखलास सहा महिन्यांनंतर इसिसच्या तावडीतून सुटून आली. 

सेक्स गुलाम म्हणून बंधक बनविले 

आपल्या काळ्या भूतकाळाला आठवत इखलासने बीबीसीला सांगितले की, तो सहा महिने रोज माझ्या रेप करत होता. मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. मी १४ वर्षांची असताना इसिसच्या दहशतवाद्यांनी माझे अपहरण केले. त्यानंतर सेक्स गुलामाप्रमाणे बंधक बनविले. उत्तर इराकच्या भागात २०१४ पासून इसिस स्टेटच्या निशाण्यावर आहे. 

माझे अश्रू सुकले...

इसिसने पुरूषांना ठार केले, तर महिलांचे अपहरण केले. इखलास म्हणाली, आमच्यावर इतके अत्याचार झाले आहेत की अश्रू सुकले आहेत. ते ६ महिने नरकापेक्षा वाईट होते. दहशतवादी रोज रेप करत आणि मारहाण करत असत. 

अशी झाली सुटका...

इखलासने सांगितले की इसिसच्या एका भेसूर दहशतवाद्यांने १५० मुलींमधून निवडले. लांब केसांचा तो व्यक्ती एक दुर्गंधी युक्त जनावर होता. त्याला पाहून खूप भीती वाटत होती. एकदा तो लढाईवर गेला तेव्हा त्याच्या तावडीतून सुटण्याची संधी मिळाली. तेथून सुटून मी शरणार्थी शिबीरात गेली.