लंडन : जगातील सर्वात लांब सुळे असलेल्या हत्तीची हत्याची शिकार झाल्याची घटना समोर आली आहे. या देशात हत्तीमुळे पर्यटनाला वेळ आहे. लांब सुळ्याचे हत्ती हे इथलं वैशिष्ट्यं आहे. मात्र सर्वात लांब सुळे असलेल्या हत्तीची शिकार झाल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे.
हत्तीची शिकार करणाऱ्याला दंड ठोठावण्यात आला आहे. तर राष्ट्रपतींनीही हत्तीच्या शिकारी प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या हत्तीची प्रजनन क्षमता संपली होती. हत्तीला याआधीही गोळी लागली होती. त्यामुळे ट्रॉफी हंटरने बोत्सवाना इथल्या सर्वात लांब सुळ्यांचा हत्तीला टार्गेट केलं.
डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार लियोन काचेलफोर असं शिकार करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. माजी राष्ट्रपती इयान खामा यांनी नाराजी व्यक्त केली.
50 हजार डॉलर भरल्यानंतर लियोन यांनी सर्वात लांब सुळे असलेल्या हत्तीची शिकार केली. या हत्तीचं वय 50 वर्ष असल्याचं सांगितलं जातं. एकाच गोळीत या हत्तीची शिकार करण्यात आली.
बोत्सवाना भागात 130,000 हत्ती आहेत. पूर्ण अफ्रिकेमध्ये 40च्या आसपास लांब सुळे असणारे हत्ती आहेत. या दुर्मीळ हत्तीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सुळे आहेत. या सुळ्यांचं वजन जवळपास 45 किलोग्रामच्या आसपास असावं असं सांगितलं जातं.
शिकारी उद्योजक प्रकवक्तांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी हत्तीच्या शिकारीनंतर 2.7 मिलियन डॉलर्स देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झाली होती. शिकार आणि त्यापासून मिळणारं मांस, हस्तीदंड यातून निर्माण होणाऱ्या उत्पन्नाचा सामाजाला मोठा फायदा होतो.
या हत्तीला आधीच गोळी लागली होती. त्यामुळे तो शिकाऱ्यांच्या नजरेत होता. जर दुसऱ्या समुदायाच्या शिकाऱ्यांनी त्याची शिकार केली असती तर त्याला फायदा स्थानिक समुदायांना झाला असता. त्यामुळे सगळ्या बाजूंनी विचार करूनच या हत्तीची शिकार करण्यात आल्याचा दावा शिकारी उद्योजक प्रवक्तांनी केला.