VIDEO : कम्युनिस्ट पार्टीच्या 20 व्या काँग्रेसमधून चीनचे माजी राष्ट्रपती हू जिंताओ (Hu Jintao) यांना जबरदस्ती बाहेर काढण्यात आलं. विशेष म्हणजे, कम्युनिस्ट पार्टीच्या (China Communist Party) सभेमध्ये हू जिंताओ विद्यमान हे राष्ट्रपती शी जिनपिंग (President Xi Jinping) यांच्या शेजारी बसले होते. त्यावेळी त्यांना बाहेर काढण्यात आल्याने जगभर एकच चर्चा होताना दिसत आहे.
कम्युनिस्ट पार्टीची विशेष सभा म्हणजेच 20 व्या काँग्रेसवेळी हू जिंताओ आणि राष्ट्रपती शी जिनपिंग शेजारी शेजारी बसले होते. चीनमध्ये एकच पक्ष आहे. चीनमध्ये (China) एकपक्षीय लोकशाही पहायला मिळते. चीन कम्युनिस्ट पार्टीतील शी जिनपिंग यांच्या विरोधी गटाचे नेते म्हणून हू जिंताओ यांची ओळख आहे.
आणखी वाचा - पंतप्रधानांनी राजीनामा देताच ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी या भारतीयाचं नाव पुन्हा चर्चेत
काँग्रेस सभेवेळी हू जिंताओ आणि शी जिनपिंग यांच्यात वैचारिक वाद पेटला. एका विधेयकावरून हा वाद पेटल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. त्याचवेळी जिनपिंग यांनी हू जिंताओ यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले. यानंतर दोन्ही सुरक्षारक्षकांनी हू जिंताओंना उचललं आणि काँग्रेसच्या बाहेर काढलं. यावेळी जिंताओ यांची प्रकृती चांगली दिसत नव्हती.
Drama in China as former president Hu Jintao is escorted out of the closing ceremony pic.twitter.com/AzsqUJWuFx
— Dan Banik (@danbanik) October 22, 2022
हू जिंताओ यांना एका सुरक्षारक्षकानं पकडल्यानंतर त्यांनी शी जिनपिंग यांच्या समोरचा कागद घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिनपिंग यांनी तो कागद हिसकावला घेतला. संपुर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय.