Gold mines : जगभरातील अनेक देशात सोन्याचे उत्खनन होते. या सोन्यामुळे त्या त्या देशांची अर्थव्यवस्था चालत असते. मात्र या देशांसाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगभरातील सोन आता संपत चाललंय. येत्या 20 वर्षात पुथ्वीवरचे सोने संपणार आहे? त्यामुळे ही फारच चिंताजनक बाब आहे. तज्ञांनी देखील यावर चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पृथ्वीवर किती टक्के सोने उरलंय? आणि सोन्याचा नवीन शोध कूठून लावण्यात येणार आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँक गोल्डमन सॅक्सला भीती आहे की, येत्या 20 वर्षांत जमिनीखालील सोने पूर्णपणे संपणार आहे. कारण जगभरात खुप वेगाने उत्खनन होत आहेत, त्यामुळे पृथ्वीवरचे सोने संपत चालले आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात सोने पुर्णपणे संपन्याची भीती आहे,
यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेनुसार, आतापर्यंत सुमारे 2 लाख टन सोने काढले गेले आहे. आता पृथ्वीवर फक्त 50 हजार टनच सोने शिल्लक आहे. जर पृथ्वीखाली 50 हजार टन सोने उरले असेल तर ते दोन मालवाहू जहाजांमध्ये येऊ शकेल इतकेच आहे. विशेष म्हणजे पृथ्वीवर किती टक्के सोने शिल्लक आहे, याबाबत वेगवेगळ्या संस्था वेगवेगळी आकडेवारी देतात, त्यात थोडाफार फरक असतो.
अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकर जिम रिचर्ड्स त्यांच्या 'द न्यू केस फॉर गोल्ड' या पुस्तकात सांगतात की, सोने संपणार आहे, याबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहे. मात्र तरीही खाणकाम चालूच राहील. यासाठी नवीन तंत्रे येतील. ज्या ठिकाणी कोणी जात नाही अशा ठिकाणी खाणी टाकल्या जातील.या सगळ्यामुळे असे होईल की छोट्या खाण कंपन्यांच्या जागी फक्त काही कंपन्याच उरतील. तसेच पैसा असणाऱ्या कंपन्या सर्व अशक्य वाटणाऱ्या ठिकाणांचा शोध घेतील.
पृथ्वीवर जरी सोने संपले तरी अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथून सोने उत्खनन केले जाऊ शकते. जसे समुद्राच्या खाली, बर्फाळ वाळवंटात शोध घेतला जाऊ शकतो. या प्रश्नावर खगोल भौतिक शास्त्रज्ञ डॉ. नील डीग्रास टायसन यांनी सुचवले की अंतराळात असलेल्या लघुग्रहांमध्ये सोन्याचा साठा असू शकतो. हे खरे असेल तर ही जगासाठी मोठी आशा असू शकते.
अंतराळात बृहस्पति आणि मंगळ यांच्यामध्ये एक असा लघुग्रह आहे, ज्याला स्पर्श केल्यास पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होईल. या लघुग्रहाचे नाव 16-सायक आहे, जो सोने, प्लॅटिनम, निकेल आणि लोहापासून बनलेला आहे. सुमारे 225 किलोमीटर व्यासाच्या या तुकड्यात इतके सोने आहे, ज्याची निश्चित गणनाही करता येत नाही.
पृथ्वीवर सोने संपल्यास सर्वसामान्यांवर त्याचा मोठा परिणाम होणार आहे.सोन्याची भाव (Gold Rate) वाढण्याची भीती आहे. यामुळे ते सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर जाईल. अशा परिस्थितीत नागरीकांजवळ असलेले सोनेच शेवटचे सोने असणार आहे. आणि हाच त्यांचा आधार असणार आहे.
दरम्यान ही घटना जगभरातील संपुर्ण देशांसाठी धक्कादायक असणार आहे.याचा सर्वसामान्यांवर मोठा परिणाम होणार आहे.