अरे हा तर मंगळग्रह...; हा धबधबा पाहून तुम्हीही म्हणाल निसर्गाचा अद्भूत चमत्कारच

Hengifoss Waterfall Iceland: धबधब्याचे सुंदर व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत अनेकदा पाहिले असतील. पण सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होतोय. पाहा. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 21, 2023, 12:00 PM IST
अरे हा तर मंगळग्रह...; हा धबधबा पाहून तुम्हीही म्हणाल निसर्गाचा अद्भूत चमत्कारच  title=
Hengifoss Waterfall Iceland Facts Twitter Video Viral

Trending News In Marathi: जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जी त्यांच्या सुंदरतेमुळं लोकप्रिय झाले आहेत. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या जागेच्या सुंदरतेबरोबरच तिथला इतिहासही रोचक असतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील सुंदर दृश्य पर्यटकांना खूपच भावले आहे. व्हिडिओतील दिसणारे हे दृश्य हेंगिफॉस आयलँड येथील आहे. हेंगीफॉस हा आइसलँडमधील तिसरा सर्वात उंच धबधबा आहे, 128 मीटर. हे पूर्व आइसलँडमधील फ्लोत्सदलश्रेपपूरमधील हेंगीफोसा येथे आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा सुंदर व्हिडिओ @missfacto या नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. 11 सेंकदाचा हा व्हिडिओ आत्तापर्यंत 5 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ शेअर करताना एकाने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, हेंगिफॉस आयलँडमधील तिसरा सर्वात उंच धबधबा आहे. बेसाल्टिक खडकांवरुन वाहणाऱ्या या धबधब्याचे रुप खूपच सुंदर आहे. 

ज्या खडकांवरुन हा धबधबा वाहतोय त्या बेसाल्टिक खडकाच्या आत लाल मातीचा थर आहे. धबधब्याच्या चारही बाजूने हा मातीचा लाल थर पाहायला मिळतोय. हा खडक जवळपास पाच ते सहा मिलियन वर्ष जुना असून ज्वालामुखीच्या विस्फोटामुळं याचा निर्माण झाले आहे. चहूबाजूने लाल मातीचा थर आणि उंचावरुन पडणारा फेसाळता धबधबा यामुळं हे दृश्य म्हणजे जणू स्वर्गच असल्याचा भास होतो. निसर्गाचा चमत्कार म्हणावा अशी ही जागा आहे. या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. 

https://twitter.com/i/status/1702145050086355021

 हा आइसलँडमधील तिसरा सर्वात उंच धबधबा आहे. हा धबधबा अद्भूत धबधब्यापैकी एक असल्याचे म्हटले जाते. हेंगिफॉस असं या धबधब्याचे नाव असून दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. आत्तापर्यंत ज्या लोकांनी या धबधब्याचा भेट दिली आहे. ते म्हणतात की हा धबधबा मंगळग्रहाप्रमाणेच वाटतो. मंगळ ग्रहाप्रमाणे लालमाती असल्याने असा भास होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, धबधब्यातून खाली पडणारे पाणी हे दुधासारखे सफेद दिसून येते. मात्र, खाली आल्यानंतर या पाण्याचा रंग निळा आणि हिरवा होतो. यामुळंच हा धबधबा खूपच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही धबधब्याचा हा व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला आहे.