मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले आणि टेस्ला आणि स्पेस-एक्सचे प्रमुख इलॉन मस्क यांचे गुगलचे सहसंस्थापक सर्गे ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहान सोबत अफेअर सुरु असल्याची चर्चा आहे. या सबंधित बातम्या देखील प्रसिद्ध माध्यमांत झळकल्या आहेत. या बातम्यानंतर आता प्रथमच इलॉन मस्कने या अफेअरवर उत्तर दिले आहे.
इलॉन मस्क गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहान हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची माहीती आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी काही महिन्यांपूर्वी निकोल शानाहानपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सेर्गे ब्रिन यांनी आपल्या पत्नीचे एलोन मस्कसोबतच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याची बातमी देण्यात आली होती.
अफेअरवर इलॉन मस्क काय म्हणाले ?
गुगलचे सहसंस्थापक सर्गे ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहान यांच्यासोबतच्या रिलेशनशिपच्या वृत्तावर इलॉन मस्क याने प्रथमच उत्तर दिले आहे. 'हा पूर्ण मूर्खपणा आहे. सर्गेई आणि मी मित्र आहोत आणि काल रात्री एकत्र पार्टीत होतो! मी तीन वर्षांत फक्त दोनदा निकोलला पाहिले आहे आणि दोन्ही वेळा आमच्या आसपास बरेच लोक होते. काहीही रोमँटिक नाही, असे त्यानी सांगितले आहे.
दरम्यान इलॉन मस्कने उत्तर देत निकोल शानाहान सोबत होत असलेल्या रिलेशनशिपच्या चर्चा फेटाळल्या आहेत.