'उत्तम सेक्स हेच माझ्या..'; 'त्या' विधानावरुन बायडेन ट्रोल! लोक म्हणाले, 'ज्यांना न धडपडता...'

US President Joe Biden Talks About Sex: अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचं हे विधान एका नव्या पुस्तकाच्या निमित्ताने चर्चेत आलं आहे. हे पुस्तक अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नींच्या कारकिर्दीचा आढवा घेणार असून सध्या बायडेन यांनी पत्नी जीलबद्दल केलेलं विधान चर्चेत असून त्यावरुन ते ट्रोल होत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 25, 2024, 12:18 PM IST
'उत्तम सेक्स हेच माझ्या..'; 'त्या' विधानावरुन बायडेन ट्रोल! लोक म्हणाले, 'ज्यांना न धडपडता...' title=
एका पुस्तकामुळे बायडेन यांचं हे विधान सध्या चर्चेत

US President Joe Biden Talks About Sex: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल केलेलं एक विधान सध्या चांगलेच चर्चेत आहे. 'माझ्या यशस्वी वैवाहिक आयुष्याचं गुपीत 'उत्तम सेक्स'मध्ये दडलेलं आहे,' असं जो बायडेन यांनी म्हटलं आहे. केटी रॉजर्स यांनी लिहिलेल्या, 'अमेरिकन वुमेन: द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॉडर्न फर्स्ट लेडी, फ्रॉम हिलरी क्लिंटन टू जील बायडेन' नावाच्या आगामी पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. प्रकाशनापूर्वी या पुस्तकातील मोजक्या भागाचा रिव्ह्यू 'डेली मेल'ने केला आहे. त्यामध्येच या दाव्यासंदर्भातील खुलासा करण्यात आला आहे. रॉजर हे न्यूयॉर्क टाइम्समधील पार्ट टाइम रिपोर्टर आहेत. 

अनेकदा पत्नीचं चुंबन घेताना कॅमेरात कैद

जो बायडेन हे अनेकदा त्यांची पत्नी जील बायडेन यांच्याबद्दलच्या भावना सार्वजनिकपणे व्यक्त करताना दिसतात. अनेकदा जो बायडेन यांनी आपल्या एअर फोर्स वन या विमानामध्ये बसण्याआधी कॅमेरासमोर पत्नीचं चुंबन घेतल्याचंही ते राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पाहायला मिळालं आहे. हे दोघेही बऱ्याचदा डेटवरही जातात. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये जो बायडेन यांनी स्वत:ची ओळख 'जीलचा पती' अशी करुन दिली आहे. व्हाइट हाऊसमधील सर्वोच्च नेतेपदी असतानाही जो बायडेन हे जबाबदारीच्या ताणतणावमध्ये आपलं नातं अशा रोमँटिक पद्धतीने जपत असल्याचं डेली मेलमध्ये म्हटलं आहे. 

राजकारणाऐवजी वैवाहिक जीवनाला प्राधान्य

2006 च्या एका मुलाखतीमध्ये जो बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळण्यापेक्षा आपल्याला कुंटंब आणि वैवाहिक जिवनातील सुख अधिक महत्त्वाचं असल्याचं म्हटलं होतं. "मी इतर काही करण्याऐवजी घरी बसून माझ्या पत्नीवर प्रेम करेन," असं बायडेन म्हणाले होते. या विधानंतर त्यांच्यावर राजकीय इच्छाशक्ती कमी असलेला नेते अशी टीकाही झाली होती. मात्र त्यांच्या प्रवक्त्यांनी ते अखंडपणे जील यांच्या प्रेमात असल्याचं विधानावरुन स्पष्ट होतंय असं म्हटलं होतं.

ज्यांना न धडपडता शिड्या चढता येत नाहीत...

दरम्यान, या नव्या पुस्तकाच्या निमित्ताने जो बायडेन यांनी 'गुड सेक्स'बद्दल केलेल्या विधानावरुन नेटकऱ्यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना ट्रोल केलं आहे. "न धडपडता साऱ्या शिड्याही न चढू शकणारे जो बायडेन हे त्यांच्या उत्तम वैवाहिक आयुष्याचं गुपित उत्तम सेक्स असल्याचं सांगतात. हे खरं वाटतं का?" असं एका एक्स युझरने (ट्विटर युझरने) या बातमीवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे. "आपल्या सेक्स लाइफबद्दल व्हाइट हाऊसमधील सहकाऱ्यांशी बोलणं योग्य असल्याचं जो बायडेन यांना वाटतं. मात्र मला असं वाटतं की याबद्दल तिथलं कोणीही विचार करत नसेल. तसेच त्यांना (व्हाइट हाऊसमधील कर्मचाऱ्यांना) या विधानांचं आश्चर्यही वाटलं नसेल," असा टोला अन्य एकाने लगावला आहे. "बायडेन आणि सेक्स हे दोन्ही शब्द मला पुन्हा कधीच एका वाक्यात पाहायला आवडणार नाही," असा शाब्दिक चिमटा अन्य एकाने काढला आहे.