न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये ई-बाईकमुळे भीषण आग, भारतीय पत्रकाराचा मृत्यू

New York:  हार्लेम न्यूयॉर्कमध्ये एका अपार्टमेंटच्या बिल्डींगमध्ये भीषण आग लागलीय.

Pravin Dabholkar | Updated: Feb 25, 2024, 10:57 AM IST
न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये ई-बाईकमुळे भीषण आग, भारतीय पत्रकाराचा मृत्यू  title=
Harlem Fire

New York: न्यूयॉर्कच्या हार्लेममधील एका अपार्टमेंटच्या बिल्डींगला भीषण आग लागली. या आगीत 27 वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. फाजिल खान असून याचे नाव असून त्याच्या परिवार आणि मित्रांशी आम्ही संपर्कात आहोत, अशी माहिती न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासांनी दिली आहे. 

भारतीय दूतावासांकडून एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हार्लेम न्यूयॉर्कमध्ये एका अपार्टमेंटच्या बिल्डींगमध्ये भीषण आग लागलीय.

यामध्ये 27 वर्षीय भारतीय नागरिक फाजिल खानच्या मृत्यूची बातमी वाचून अत्यंत वाईट वाटले. फाजिल खान याचा परिवार आणि मित्रांच्या आम्ही संपर्कात आहे. त्याचे पार्थिव भारतात पाठवण्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करत आहोत, असे यामध्ये म्हटले आहे.

फाजिल खान हा  कोलंबिया पत्रकारितेचा माजी विद्यार्थी होता. द हेचिंगर रिपोर्ट आणि नवाचारमध्ये त्याने रिपोर्टिंगचे काम केले होते. फाजिल खानच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार 2018 मध्ये त्याने कॉपीएडीटर म्हणून करिअरला सुरुवात केली. न्यूयॉर्कला जाण्यापूर्वी 2020  मध्ये त्याने दिल्लीतील एका चॅनलमध्ये अ‍ॅंकर म्हणून काम केलंय. 

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका लिथियम बॅटरीमुळे हार्लेम अपार्टमेटमध्ये भीषण आग लागली. आगीत 17 जण जखमी झाले तर अनेकजण सैरावैरा पळून गेले. काहींना रश्शी टाकून नाट्यमयरित्या वाचवण्यात आले. सर्वात वरच्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर लोकांनी खिडक्यांतून उड्या मारायला सुरुवात केली.  या घटनेत 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे तर 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4 जणांची स्थिती अत्यंत गंभीर आहे.