एक्स बॉयफ्रेंडच्या फसवणुकीमुळे चिडलेल्या तरुणीने रचला हत्येचा कट, पण...

तिला जेव्हा कळलं की, की अ‍ॅडम तिची फसवणूक करुन दुसऱ्याच एका मुलीसोबत फिरत आहे, त्यावेळी मात्र तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.

Updated: Apr 13, 2022, 10:55 PM IST
एक्स बॉयफ्रेंडच्या फसवणुकीमुळे चिडलेल्या तरुणीने रचला हत्येचा कट, पण... title=

मुंबई : असे अनेक लोकं आहेत, जे प्रेमाच्या बाबतीत अपयशी ठरले आहेत. त्यांचा जोडीदारा एकतर त्यांना सोडून गेला असावा किंवा त्याने चीट केलं असावं. ज्यामुळे त्याच्यावरती राग येणं हे तर सहाजीकच आहे. ज्यामुळे काही जण आपल्या अशा जोडीदाराला त्रास देण्याचा प्लॅन देखील आखतात. परंतु एका तरुणीनं तर आपल्या एक्सला फसवणूक केल्यामुळे जिवे मारण्याचा प्लान आखला. या तरुणीनं आपल्या एक्स बॉयफ्रेंडचं अपहरण करुन त्याला मारण्याचा कट रचला. यासाठी तिने संपूर्ण किट देखील विकत घेतलं होतं. परंतु यादरम्यान या तरुणीसोबत असं काही घडलं, ज्याचा तिने विचार देखील केला नसावा.

हे प्रकरण ब्रिटनचे आहे. सोफी जॉर्ज असं या तरुणीचं नाव आहे. 20 वर्षांच्या या तरुणीचं ऑक्टोबर 2019 मध्ये अ‍ॅडम योसेसोबत प्रेम प्रकरण सुरु होतं. ब्राइटन विद्यापीठात शिकत असताना सोफी आणि अ‍ॅडम एका स्टेशनवर भेटले. तेव्हा सोफी फक्त 17 वर्षांची होती.

परंतु तिला जेव्हा कळलं की, की अ‍ॅडम तिची फसवणूक करुन दुसऱ्याच एका मुलीसोबत फिरत आहे, त्यावेळी मात्र तिने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु तिच्या मनात त्याच्याबद्दल राग असल्यामुळे तिनं त्याचं छोटं मोठं नुकसान नाही, तर त्याला थेट संपवण्याचा प्लान आखला.
 
डेली मेलच्या रिपोर्टनुसार, सोफीजवळ हत्येशी संबंधित संपूर्ण किट सापडलं आहे. तिच्याकडे ब्लीच, डक्ट टेप, फॉरेन्सिक कापड आणि प्लास्टिक पिशवीसह इतर वस्तू होत्या.

सोफीने हत्येची संपूर्ण प्लान कागदावर लिहून ठेवली होती. सोफीचा असा प्लान होता की, आधी गाडी चालवून ती कबरपर्यंत न्यायची. त्यानंतर ती अ‍ॅडमवर अत्याचार करणार होती आणि त्यानंतर त्याला मारून दफन करण्याचा तिचा संपूर्ण प्लान होता.

ज्यामुळे ती पहिली अ‍ॅडमला भेटली आणि आपल्या गाडीतून कामासाठी घेऊन गेली. ज्यानंतर सोफीने अ‍ॅडमवर मोठ्या चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा चाकू अ‍ॅडमच्या हाताला लगला आणि तो कसा-बसा कारमधून बाहेर आला. कारमधून बाहेर येताच अ‍ॅडमने पोलिसांना कॉल करुन बोलावले. परंतु रागावलेल्या सोफीनं तोपर्यंत अ‍ॅडमचं एक बोट कापलं.

यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सोफीकडून अ‍ॅडमला मारण्यासाठी आणलेलं किट जप्त केलं आणि तिला देखील अटक केली. पोलिसांना सोफीकडून एक अर्जही मिळाला होता, ज्याद्वारे ती स्वत:चे नाव बदलून नवीन पासपोर्टसाठी अर्ज करणार होती आणि अ‍ॅडमला मारुन येथून निघून जाणार होती. परंतु तिचा हा प्लान फसला आणि पोलिसांनी तिला पकडलं.

ब्रिटनच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायाधीश म्हणाले- ही खूप मोठी योजना होती. ती जे करणार होती, ते चुकीचे होते हे सोफीला चांगलेच माहीत होते. त्यात तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे. तसेच आपल्याजवळ शस्त्र बाळगल्याची कबुली दिली. 
ज्यामुळे न्यायालयाने सोफीला दोषी ठरवून साडे तेरा वर्षांची शिक्षा सुनावली.