बड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका

Gigi Hadid Arrested Travelling with Ganja: हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल गिगी हदीद हिला गांजा विमानप्रवासात नेत असल्याकारणानं अटक करण्यात आली आहे. शेवटी त्यासाठी तिला मोठी रक्कम मोजवी  लागली असून तिला जामीनही देण्यात आला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 19, 2023, 01:15 PM IST
बड्या हॉलिवूड अभिनेत्रीकडं सापडला गांजा; इतके डॉलर्स दिल्यावर झाली सुटका  title=
July 19, 2023 | Gigi Hadid arrested while traveling with friend in Cayman Islands (Photo: Zee News)

Gigi Hadid Arrested Travelling with Ganja: हल्ली विमानप्रवासातूनही अनेक गैरप्रकार घडताना दिसत आहेत. त्यातून अमली पदार्थ किंवा त्यांची तस्करी अथवा चोरी अशा नानाविध घटनाही घडताना दिसतात. त्यामुळे विमानात प्रवास करणं हे किती सोप्पं आहे यावरही शंकाकुशंका उपस्थित होताना दिसत आहेत. त्यातून अशा काही चर्चांमध्ये आता अशीच एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. एका सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्रीकडे गांजा आढळला आहे. आपल्याला माहितीच आहे की गांजा हा पदार्थ सर्वात महागडा आणि त्याला येणारी किंमत ही प्रचंड आहे. जगभरात यावर अनेकदा निर्बंध घातले गेले असून अशाप्रकारे गांजा स्वत:जवळ बाळगणं हा एकप्रकारे गुन्हा आहे. तरूण पिढीमध्ये जगाच्या अनेक कानाकोपऱ्यात गांजा, ड्रग्ज यांचे सेवन आणि व्यापार होताना दिसतो ज्यावर पोलिस विभाग योग्य ती कारवाई करतेच. 

मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. आपल्या फॅशन आणि अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका लोकप्रिय हॉलिवूड अभिनेत्री गिगी हदीदकडे गांजा सापडला आहे. विमानप्रवासादरम्यान या अभिनेत्रीकडून गांजा जप्त करण्यात आला आहे. तिनं अशाप्रकारे गांजा विमानातून घेऊन गेल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. सोबतच तिला मोठा दंडही ठोठावण्यात आला आहे. 'रोलिंग स्टोन'च्या वृत्तानुसार, तिच्याजवळ गांजा (marijuana) आढळ्यानं तिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणानं सगळीकडेच खळबळ माजली आहे. यासाठी तिला मोठी किंमतही मोजावी लागली आहे. केमन आयलंड्सला सुट्टीसाठी फिरायला गेलेल्या या अभिनेत्रीकडे मागच्या आठवड्यात गांजा असल्याचे आढळून आले आहे. 

नक्की काय घडला प्रकार?

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, गिगी हदीद ही तिची मैत्रीण लिआह निकोल मॅककार्थी हिच्यासोबत केमन आयलंड्सच्या सुट्टीसाठी प्रवास करत होती तेव्हा विमानप्रवासादरम्यान हा प्रकार घडला. त्यावेळी अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर मात्र त्यांनी त्या दोघींच्याही बॅंगाची झडती घेण्यात आली होती. त्यावेळीच विमानतळावरील झडती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना त्या दोघींच्या बॅंगेत गांजा आढळल्याचे समजून आले आहे. सोबत त्यासंबंधीचे साहित्यही आढळून आले आहे. 

समोर आलेल्या माहितीनूसार हेही कळते की, केमन आयलंडवरून जाऊन त्या दोघी या गांज्याचे सेवन करणार होत्या आणि त्यासाठी काही भांडीही त्यांच्यासोबत सापडली आहेत. 'मिंट'च्या रिपोर्टनुसार, त्यांना तिथून प्रिझर्नर डिटेन्शन सेंटर येथे नेण्यात आले आणि मग त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. 12 जूलै रोजी त्यांना कोर्टापुढे हजर करण्यात आले होते. या कृतीसाठी त्यांना 1000 डॉलर दंड ठोठवण्यात आला व त्यांना यात दोषी ठरवण्यात आले. ही रक्कम भरल्यानंतर त्यांची सुटका झाली. गिगी हदीदच्या प्रतिनिधीनं 'रोलिंग स्टोन'ला दिलेल्या माहितीनुसार, तिच्याकडे न्यूयॉर्कमधून घेतलेला गांजा होता. ज्यासाठी कायदेशीर मेडिकल लायसन्स होते. 2017 पासून मेडिकल वापरासाठी केमन आयलंडवर हा गांजा कायदेशीर असल्याचेही म्हटले जाते. 

हेही वाचा - '...अन्यथा कायदेशीर कारवाई करू'', मीना कुमारी यांच्या बायोपिकवर भडकला मुलगा तेजार अमरोही

कोण आहे गिगी हदीद? 

गिगी हदीद ही अमेरिकन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. त्यातून सुपरस्टार लिओनार्डा डायकॅपेरियोला ती डेट करत असल्याचेही समोर आले होते. तिला काई नावाची एक लहान मुलगीदेखील आहे.