Space Travel: भन्नाट स्टार्टअप! आता रॉकेटची गरज नाही, चक्क पॅराशूटमध्ये बसून करा अंतराळाची सफर

अंतराळाची सफर घडवणारा हा महाकाय पॅराशूट हाइड्रोजन आणि हेलियमचा असणार आहे.  हे पॅराशूट पृथ्वीच्या कक्षेपासून  (Earth's Atmosphere) 25 किलोमीटर उंचीवर उडणार आहे. यामुळे पर्यटकांना पृथ्वीचे विहंगम दृष्य पहायला मिळणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 8, 2023, 06:42 PM IST
Space Travel: भन्नाट स्टार्टअप! आता रॉकेटची गरज नाही, चक्क पॅराशूटमध्ये बसून करा अंतराळाची सफर title=

Space Travel Offer: जपानचे उद्योजक आणि अंतराळवीर यासुका मिजावा यांनीही स्पेस टूरची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प केला आहे. एलन मस्क यांची कंपनी 'स्पेस एक्स'ही चंद्राची सफर घडवणार आहे. या सगळ्यातच आता  पॅराशूटमध्ये बसून अंतराळाची सफर करता येणार आहे. फ्रेंच स्टार्टअप  पर्यटकांना अंतराळात लग्जरी टूरिजमचा अनुभव देणार आहे. अंतराळातील ही लग्जरी टूर असल्याने प्रवाशांना या टूरसाठी कोट्यावधी रुपये मोजावे लागणार आहेत. 

मानवाचे अंतराळात सफर करण्याचे स्वप्न आता अगदी सहज शक्य होणार आहे. अंतराळ मोहिम अथवा स्पेस टूर म्हंटल की डोळ्यासामोर येतात ते अंतराळ यान, रॉकेट आणि स्पेस सूट घातलेले अंतराळवीर. आता मात्र, अंतराळाची सफर अगदी सहज शक्य होणार आहे. पॅराशूटमध्ये बसून अंतराळाची सफर करता येणार आहे. 

स्पेस पर्सपेक्टिव नावाच्या फ्रेंच स्टार्टअपने स्पेस टूरिजमची भन्नाट संकल्पना आणली आहे.  महाकाय पॅरेशूटमधूल हे स्टार्टअप पर्टकांना अंतराळी सफर घडवणार आहे.  Space.com या बाबतचे वृत्त दिले आहे. स्पेस पर्सपेक्टिवने Zephalto या स्टार्टपच्या माध्यमातून  पॅराशूटच्या माध्यमातून पर्यटकांना अंतराळाची सफर घडवली जाणार आहे. जागतिक अंतराळ संस्था सेंटर नेशनल डी'एट्यूड्स स्पेटियल्स (CNES) च्या माध्यमातून Zephalto या अंतराळ सफरीचे आयोजन करणार आहे. 

पॅराशूटमधून पाहा पृथ्वीचे नयनरम्य दृष्य

अंतराळाची सफर घडवणारा हा महाकाय पॅराशूट हाइड्रोजन आणि हेलियमचा असणार आहे. हे पॅराशूट पृथ्वीच्या कक्षेपासून  (Earth's Atmosphere) 25 किलोमीटर उंचीवर उडणार आहे. यामुळे पर्यटकांना पृथ्वीचे विहंगम दृष्य पहायला मिळणार आहे. 

2025 मध्ये पहिली टूर

पॅराशूटमधून केल्या जाणाऱ्या या स्पेस टूरची पहिली ट्रायल 2024 मध्ये होणार आहे. तर, 2025 मध्ये पर्यटकांची पहिली टूर निघणार आहे. Zephalto नावाच्या वेबसाईटवरुन याचे बुकींग सुरु झाले आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे बुकींग केले जाणार आहे. यासाठी किंमती देखील वेगवेगळ्या असणार आहेत. फ्रेंच स्पेसपोर्टवरून हे पॅराशूट उड्डाण करणार आहे. 

पॅराशूट स्पेस टूरला किती खर्च येणार?

पॅराशूटद्वारा करण्यात येणाऱ्या या स्पेस टूरसाठी प्रति व्यक्ती 132,000 डॉलर अर्थात भारतीय रुपयांमध्ये 1,07,87,647.20 इतके शुल्क आकारले जाणार आहे. या स्पेसटूर दरम्यान पॅराशूटमध्ये स्पेस डाईन इनचा देखील अनुभव घेता येणार आहे. या स्पेस टूर दरम्यान पर्यटकांना पॅराशूटमध्ये वाय फायची सुविधा देखील उपलब्ध करुन दिली जाणार आहे. जेणेकरुन पर्यटक त्यांचा या पॅराशूटमधून केल्या जाणाऱ्या स्पेस टूरचा अनुभव सोशल मिडियावर लाईव्ह शेअर करु शकतात.