Mother's Day 2023 : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. ', मातृदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

History of Mothers Day : जगातील सर्वात पवित्र नाते म्हणजे आई आणि वडील. मुले कितीही मोठी झाली तरी आईसाठी नेहमीच लहानच असतात. आज 8 मे आहे आणि 8 मे हा दिवस जगभरात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो.

Updated: May 8, 2023, 05:18 PM IST
Mother's Day 2023 : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.. ', मातृदिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व  title=
mothers day 2023

Happy Mother's Day 2023 : 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'.. 'श्यामची आई' या चित्रपटातील हे गाणे ऐकून आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. आईच्या कुशीत अख्य जग जगता येते. आईसमोर मनावरचे  दुःखाचं ओझ हलके करु शकतो. म्हणूनच आई या शब्दाचा अर्थ नेमकं मांडता येत नाही. आज 'मदर्स डे' म्हणजे मातृदिन. 8 मे या तारखेला मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण आईला शुभेच्छा देतात, कोणी भेटवस्तू देतो तर कोणी घरच्या कामात मदत करतो. मात्र, हा दिवस कधी आणि कसा साजरा केला जातो हे फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया...

मातृदिन म्हणजे काय?

जगभरात सर्व आईसाठी हा दिवस महत्त्वाचा असतो. मदर्स डे अशा स्त्रीसाठी आहे जिला निसर्गाने जन्म दिला आहे. तिच्यावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी, तिचा सन्मान करण्यासाठी, मदर्स डे विशेषत: प्रत्येक स्त्रीसाठी साजरा केला जातो ज्याची भूमिका प्रत्येक टप्प्यावर बदलत राहते, अशा प्रत्येक स्त्रियासाठी विशेषत्वाने साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मातृदिन...

मातृदिनाचा इतिहास 

मदर्स डेबद्दल अनेक वेगवेगळ्या समजुती आहेत. काहींच्या मते मातृदिनाची सुरुवात अमेरिकेतून झाली. वर्जिनियामध्ये अॅना जार्विस नावाच्या महिलेने मदर्स डेची सुरूवात केली. असे म्हटले जात होते की, अॅना आपल्या आईवर फार प्रेम करत होती आणि तिच्याकडून बरीच काही तिने शिकले होते. तिने कधीही लग्न केले नाही आणि तिच्या आईच्या मृत्यूनंतर, तिने तिच्यासाठी आदराचा विशेष दिवस सुरू केला. ख्रिश्चन समाजातील लोक व्हर्जिन मेरीचा दिवस साजरा करतात. हा दिवस युरोप आणि ब्रिटनमध्ये मदरिंग संडे म्हणून साजरा करतात. 

तर काही जणांच्या मते,  मातृदिनाची सुरुवात ग्रीस मध्ये झाली असं ही म्हटले जाते. ग्रीक लोक आपल्या आईचा फार सन्मान करतात. त्यांच्या इच्छेचा आदर करतात. म्हणूनच या दिवशी तिची पूजा करतात. मान्यतेनुसार स्यबेसे ग्रीक देवातांची आई होती आणि मातृदिनी दिवशी तिची पूजा करत होते. 

म्हणूनच मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा होतो

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी 9 मे 1914 रोजी मदर्स डे साजरा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमेरिकेच्या संसदेत दर मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याचा कायदा मंजूर करण्यात आला. त्यानंतर युरोप आणि भारतातील देशांनी तो मदर्स डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.