Green Comet : 50 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच दिसणार हिरवा धूमकेतू; 12 जानेवारी, तारीख अजिबात विसरु नका

2 मार्च 2022 रोजी इथ्री नावाचा हा धूमकेतू खगोलशास्त्रज्ञांनी शोधला होता. हा धूमकेतू गुरु ग्रहावर जवळून गेला होता. आता हाच धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येणार असल्याचे NASA ने म्हंटले आहे. 12 जानेवारी रोजी हा धूमकेतू पाहता येणार आहे. 

Updated: Jan 10, 2023, 11:30 PM IST
Green Comet :  50 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच दिसणार हिरवा धूमकेतू; 12 जानेवारी, तारीख अजिबात विसरु नका title=

Green Comet :  अवकाश हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. अवकाशात अनेक लक्षवेधी आणि आश्चर्यकारक घडामोडी घडत असतात. खगोलशास्त्राचे अभ्यासक या घडामोडींवर लक्ष ठेवून असतात. खगोलप्रेमी देखील या घडामोडी जाणून घेण्यास उत्सुक असतात.  12 जानेवारी अशीच एका खगोलीय घटना घडणार आहे. तब्बल  50 हजार वर्षांनंतर पहिल्यांदाच  हिरवा धुमकेतू(Green Comet) दिसणार आहे. ही एक अभूतपूर्वक खगोलशास्त्रीय घटना मानली जात आहे. 
 

2 मार्च 2022 रोजी इथ्री नावाचा हा धूमकेतू खगोलशास्त्रज्ञांनी शोधला होता. हा धूमकेतू गुरु ग्रहावर जवळून गेला होता. आता हाच धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येणार असल्याचे NASA ने म्हंटले आहे. 12 जानेवारी रोजी हा धूमकेतू पाहता येणार आहे. 

कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक प्रिन्स यांनी या धूमकेतू बाबात अधिक माहिती दिली आहे. धूमकेतूचा व्यास एक किलोमीटरच्या आसपास असणार आहे. शिवाय या धूमकेतूतून हिरव्या रंगाचा प्रकाश दिसणार आहे. 

यापूर्वी मार्च 2020 मध्ये  न्यूवाईज नावाचा धूमकेतू पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळाली होती. 1997 मध्ये हेलबोप नावाचा धुमकेतू दिसला होता.  हेलबोप हा सर्वात मोठा धूमकेतू ठरला होता. याचा  व्यास तब्बल 60 किलोमीटर होता. जवळपास 18 महिने तो आकाशात दिसत होता. 2007 मध्ये मॅकनॉट नावाचा धूमकेतू पृथ्वीवरून दिसला होता. 

धूमकेतू म्हणजे काय?

धूमकेतू हे आपल्या सूर्यमालेचेच एक घटक मानला जातो. धूमकेतूंचा आकार हा ओबडधोबड दगडासारखा असतो.  धूळ, बर्फ, वायू यांच्यापासून गे धूमकेतू तयार होतात. या धूमकेतूंचा आकार काही किलोमीटरपर्यंत पसरले पहायला मिळतो. कक्षेत फिरत असताना हे धूमकेतू  सुर्याजवळून प्रवास करतात. यावेळी सुर्याच्या प्रखरतेमुळे त्यांच्यातील बर्फ वितळतो. यामुळे धूमकेतूंचा आकार बदलतो. पृथ्वीवरून पाहताना या चित्र विचित्र आकारांच्या धूमकेतूंना शेपूट दिसते. ही शेपूट दोन भागात विभागलेली असते. एक शेपूट धुलिकणांची असते तर दुसरी वायूंची असते. पृथ्वीजवळून जाताना या धूमकेतूंच्या धुलिकणांमुळे उल्कावर्षाव देखील होतो. सुर्यमालेत हे धूमकेतू आपापल्या कक्षेत सुर्याला प्रदक्षिणा घालत असतात.