अमेरिका, स्पेनमधील आगीचे रौद्ररुप, ४० लाखांपेक्षा जास्त एकर भूभाग जळून नष्ट

अमेरिकेतल्या ऑरेगनच्या जंगलात लागलेल्या वणव्यानं आतापर्यंत ३५ अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला आहे.

Updated: Sep 16, 2020, 10:11 AM IST
अमेरिका, स्पेनमधील आगीचे रौद्ररुप, ४० लाखांपेक्षा जास्त एकर भूभाग जळून नष्ट  title=
Reuters photo

वॉशिंग्टन : अमेरिकेतल्या ऑरेगनच्या जंगलात लागलेल्या वणव्याने आतापर्यंत ३५ अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला आहे. तसेच जंगलातले हजारो प्राणीही होरपळून मेलेत. अनेक लहान शहरांसह हजारो घरं वणव्यात जळून खाक झालीत. 

New evacuations ordered as California wildfires rage on

ऑरेगन, कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन या राज्यांना वणव्याचा सर्वाधिक फटका बसलाय. तीन राज्यांतील एकूण ४० लाख एकर भूभाग वणव्यात जळून नष्ट झाला आहे.

California wildfire toll reaches 23, thousands forced to flee their homes

कॅलिफोर्नियात ३४ ठार

Southern California endures second straight day of wind-stoked wildfires

कॅलिफोर्नियामधील आग काही क्षमण्याचे नाव घेत नाहीए. ही आग विझवण्यासाठी २५ अग्निशामन दलाच्या गाड्या रात्रंदिवस काम करत आहेत. ऑगस्टपासून ऑरेगॉन, कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टन राज्यातील जवळजवळ १.८ दशलक्ष हेक्टरवरील टेंडर-ड्राय ब्रश, गवत आणि वुडलँड्स जळून खाक झाले आहेत. अनेक लहान शहरं यात उद्ध्वस्त झाली आहेत. तर, हजारो घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, यात ३४ ठार ठार झाले आहेत. देशभर सध्या मोठं आरोग्य संकट निर्माण झालेलं असताना, इथे मोठ्या प्रमाणात धूराचं साम्राज्य पसरल्याचे पाहायला मिळत आहे. 

गॅलिसियातल्या जंगलात वणवा

California firm to pay $13.5 billion to wildfire victims

स्पेनमधील गॅलिसियातल्या जंगलात वणवा भडकला आहे. ओरेन्स भागातल्या  ६ हजार ७०० हेक्टर जंगल भागावर हा वणवा पसरलाय. हा वणवा विझवण्यासाठी स्पॅनीश सैनिक, १२१ अग्निशनदलाचे जवान प्रयत्न करत आहेत. या वणव्यामुळं जंगलाजवळ वसलेल्या कुलेड्रो शहरातीत परिस्थिती चिंताजनक आहे.

California: 9 killed, 35 missing in wildfire; Malibu threatened

जंगलाजवळ असलेली चार घरं सध्या जळून खाक झालीत. तसंच शहरी भागातही वणव्याचा धूर पसरलाय. त्यामुळं लोकांना श्वासनाला त्रास होतोय. तसंच जंगलाजवळच्या अनेक लोकांना घरातून स्थलांतरीत व्हायला सांगितले आहे.