एवढी सुंदर डॉक्टर की, चांगले चांगले 'आयुष्यभर मला बरं नाही', असं ढोंग करतील...

तेरे हुस्नं की क्या तारीफ करु.... अशीच अवस्था ती समोर आल्यावर प्रत्येकाचीच होत असणार यात शंका नाही...  

Updated: Feb 4, 2022, 06:15 PM IST
एवढी सुंदर डॉक्टर की, चांगले चांगले 'आयुष्यभर मला बरं नाही', असं ढोंग करतील... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : काही व्यक्ती या पाहताक्षणीच मनात घर करुन जातात. त्यांचं आपल्याशी कोणतं नातं असो वा नसो, पण त्यांच्याकडे पाहूनच फार प्रसन्न वाटतं. थेट बोलावं तर अशा व्यक्तींकडे पाहतच रहावसं वाटतं. 

सध्या असंच एका चेहऱ्याकडे पाहून वाटत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा चेहरा साऱ्या जगासमोर आला आहे. 

हा चेहरा आहे, डॉक्टर शफाक अख्तर यांचा. पाकिस्तानमध्ये झालेल्या Miss Pakistan Universal 2022 या सौंदर्यस्पर्धेत शफाक सहभागी झाली आणि पाहता पाहता तिच्या रुपावर अनेकजण भाळले. 

व्हर्च्युअली झालेल्या या कार्यक्रमाचं आयोजन कॅनडामध्ये झालं. तर विजेत्यांना लाहोरमध्ये किताब देण्यात आला. 

डॉक्टर शफाक अतिशय सुंदर असल्यामुळे असे डॉक्टर असतील तर कोणीही आजारी पडेल, असंच अनेक नेटकरी म्हणत आहेत. 

काहींनी तर त्यांच्या या सौंदर्यावर शेरोशायरीही करण्यास सुरुवात केली आहे. 

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या शफाकच्या बऱ्याच पोस्ट सतत व्हायरल होत असतात. 

यामध्ये तिच्या फोटोशूटला अनेकांचीच सातत्यानं पसंती मिळताना दिसते. 

ऑफ शोल्डर लूक असो, एखादा गाऊन असो किंवा मग अगदी डॉक्टरांच्या भूमिकेत असताना घातलेला कोट असो प्रत्येक वेळी शफाक तितकीच सुरेख दिसते. 

तिचे फोटो आणि हे देखणं रुप पाहून तुम्हाला काय वाटतं... ? आहे का तुमच्या नजरेत अशी कुणी डॉक्टर ?