गर्लफ्रेंडचं नाव लपवण्यासाठी नवऱ्याची अनोखी शक्कलं, या जोडप्याच्या मुलीकडून खूलासा

टिक-टोक व्हिडीओमध्ये या मुलीने सांगितले की...

Updated: Jul 17, 2021, 10:18 PM IST
गर्लफ्रेंडचं नाव लपवण्यासाठी नवऱ्याची अनोखी शक्कलं, या जोडप्याच्या मुलीकडून खूलासा title=

लंडन : आपल्या होणाऱ्या मुलाचे नाव पालक बऱ्याचदा ठरवून ठेवताता. ते आपल्या लहान बाळाचं नाव कोणत्यातरी पूर्वजांच्या नावावर किंवा एखाद्या नावाचा चांगला अर्थ बघून ठेवतात. तर काही लोकं त्यांच्या मुलांचे नावे असे काहीतरी ठेवण्याचा प्रयत्न करतात की, त्यामधून त्यांना कोणत्या तरी गोष्टीची जाणीव किंवा आठवण येईल. मात्र एका वडिलांनी आपलं अवैध संबंध घरात बायकोला किंवा दुसऱ्या कोणाला कळू नये म्हणून आपल्या गर्लफ्रेंडचं नाव आपल्या मुलीला दिलं.

हे रहस्य या मुलीच्या जन्मानंतर अनेक वर्षानंतरच उघडं झाले आणि त्यानंतर त्या घरात जे घडलं हे कोणाला वेगळं सांगायची गरज नाही.

मुलीचं नावा ठेवण्याची, ही गोष्ट स्वतः त्या लहान मुलीने उघड केली आहे, जिचे नाव तिच्या वडिलांनी त्यांच्या गर्लफ्रेंडच्या नावावर ठेवले होते.

टिक-टोक व्हिडीओमध्ये या मुलीने सांगितले की, "जेव्हा तिचा जन्म होणार होता, तेव्हा तिच्या आईवडिलांनी असे ठरवले की, जर मुलगा जन्माला आला तर त्याचे नाव आई ठेवेल जर मुलगी जन्मली तर तिचे वडील ठेवतील."

मुलीने पुढे सांगितले की, जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा तिच्या वडिलांनी तिचे नाव क्रिस्टीना असे ठेवले आणि रुग्णालयाच्या कागदपत्रात देखील तेच नाव लिहिले. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीसाठी हे नाव का निवडले याचे खरे कारण तिच्या आईला मात्र माहित नव्हते.

त्यानंतर सर्व काही व्यवस्थित चालू होतं. परंतु काही महिन्यांनंतर त्याच्या आईला हे समजले की, नवरा तिची फसवणूक करत आहे आणि त्यामुळेच तिच्या नवऱ्याने आपल्या मुलीचे नाव क्रिस्टीना ठेवले आहे.

पतीने नंतर असा खुलासा केला की, त्याने यासाठी आपल्या मुलीचे नाव क्रिस्टीना ठेवले, जेणेकरुन त्याने जर चुकून त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव घेतले किंवा हे नाव समोर आले तरी याबद्दल कोणाला संशय येणार नाही.

आपल्या पतीने त्याच्या प्रेयसीच्या नावावर चतुराईने मुलीचे नाव ठेवले आहे हे कळल्यावर, तिच्या आईचा राग सातव्या आसमानावर पोहोचला आणि मग काय घडेल याची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते.

हे प्रकरण अमेरिकेतील केंटकीचे आहे. क्रिस्टीनाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे, ज्यात तिने आपल्या या नाव ठेवल्याची कहाणी सांगितली आहे.