काबूल : अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी (Talibani) सत्ता स्थापन केली आहे. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mohammad Hassan Akhund) हे अफगाणिस्तानचे नवनियुक्त पंतप्रधान असणार आहेत. तर अब्दुल गनी बरादर (abdul gani baradar) हे उपपंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तर मोहम्मद इद्रीसची (Haji Mohammad Idris) देशाची सेंट्रल बँक असलेल्या अफगाणिस्तान बँकेच्या प्रमुखपदी (head of the Afghanistan central bank) नियुक्ती केली गेली आहे. मात्र तालिबानी मोहम्मद इद्रीस आणि ज्यांची सेंट्रल बॅंकेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे, त्यां दोघांच्या फोटोत साम्य आहे. त्यामुळे मोहम्मद इद्रीस यांच्या नावे चुकीचा फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. (Fact Check Misidentify New Governor Of Afghanistans Central Bank)
व्हायरल होणाऱ्या फोटोत एक व्यक्ती ऑफिस डेस्कवर बंदुक घेऊन बसला आहे. तसेच त्याच्या समोर लॅपटॉप आहे. मात्र या व्यक्तीचा आणि अफगाणिस्तान बँकेच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेल्या मोहम्मद इद्रीसचा काहीही संबंध नाही. छायाचित्राशी संबंधित नसलेल्या फोटोची चुकीची ओळख सांगितली जात आहे. तसेच दावा केला जात आहे की, हा अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँक अफगाणिस्तान बँकेचे नवनियुक्त कार्यवाहक गव्हर्नर हाजी मोहम्मद इद्रिस आहे.
नक्की खरं काय?
हाजी मोहम्मद इद्रिस उर्फ मौलवी अब्दुल काहिर यांनी अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेने व्हायरल केलेल्या फोटोसह पोस्ट केले. त्यानुसार असे दिसून आले की दोघेही वेगळे आहेत. याव्यतिरिक्त एका अफगाणिस्तानच्या पत्रकारानुसार, बंदुकधारी व्यक्ती ही इद्रिस नसून एक सामान्य तालिबानी आहे.
तालिबानी अतिरेक्यांनी या नियुक्तीद्वारे, देशातील बँकांना आश्वासन दिलंय. त्यानुसार, त्यांना पूर्णतः कार्यरत आर्थिक व्यवस्था हवी आहे. या दरम्यान हाजी मोहम्मद इद्रीसचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इद्रीस एका बाजूला लॅपटॉपद्वारे सर्वोच्च बँकेची 'कमांड' घेताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्याच्या टेबलवर एके -47 सारखी रायफल ठेवलेली आहे.
दरम्यान, पैशांचा सोय कशाप्रकारे केली जाईल, याबाबतचा खुलासा अजूनही तालिबानने केलेला नाही. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्ला मुजाहिदने इद्रीसच्या नियुक्तीची घोषणा केली होती. इद्रीस देशाच्या सेंट्रल बँकेचे कार्यकारी प्रमुख असतील, असं जबीउल्लाने जाहीर केलं होतं. इद्रीस सरकारी संस्थानांना संघटित करतील. तसेच बँकेसंदर्भातील सर्व समस्यांचं निवारण करेल आणि समस्यांवर तोडगा काढेल, असंही त्यानी जबीउल्लाने स्पष्ट केलं होतं.
तालिबानचा काळा पैसा पांढरा
"तालिबानचा काळा पैसा पांढरा करणाऱ्या व्यक्तीला देशाच्या प्रमुख बँकेचा प्रमुख बनवलंय", असं अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह इद्रीसबाबत म्हणाले. "इद्रीस अलकायदा समर्थक आणि तालिबानी यांच्यात आर्थिक व्यवहार करायचा. तसेच दहशतवादी गट अफगाणिस्तानवर कब्जा करत आहेत" असंही त्यांनी नमूद केलं होतं.
इद्रीस हा उत्तरी जावजजान प्रातांत राहतो. इद्रीस मुल्ला अख्तर मंसूरसोबत अनेक वर्षांपासून आहे. तो सोबत असताना आर्थिक विषयी समस्येच निराकरण करायचा. अमेरिकेने 2016 मध्ये ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात मुल्ला अख्तरचा मृत्यू झाला. इद्रीसला बँकिंग क्षेत्राबाबत किती माहिती आहे, याबाबतचा कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तसेच इद्रीसचं शिक्षण किती झालंय, याबाबतचीही माहिती नाही. मात्र इद्रीस तालिबानसाठी काळा पैसा पांढरा करतो, ही त्याची ओळख आहे, अशी माहिती तालिबानी अधिकाऱ्याने दिली.
इद्रीस बँकिंग तज्ज्ञ
"इद्रीसने कधीही धार्मिक ग्रंथ वाचले नाहीत मात्र तो बँकिंग तज्ज्ञ आहे", अशी माहिती एका तालिबान्याने दिली. अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर नागरिकांना बँकेतील आपल्या मेहनतीचा पैसा काढण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी खातेधारकांची मोठी रांग लागत आहे. तर दुसऱ्या बाजूला बँकेतून ठराविक रक्कमच काढता येणार, असे निर्बंध सरकारने घातले आहेत. अमेरिकेने अफगाणिस्तानचे कित्येक कोटी रुपये गोठवले आहेत. ज्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. परिणामी बँकांकडे खातेधारकांना त्यांच्या ठेवी परत करण्यासाठी रक्कम नाही. त्यामुळे तालिबान राज्यकारभार चालवण्यासाठी चीनकडे मदत मागत आहे.