डेटा लीक : 'कॅम्ब्रिज एनालिटिका' ला भारतात मिळाले भरपूर काम, माजी कर्मचाऱ्याने घेतले काँग्रेसचे नाव

  'कॅम्ब्रिज एनालिटिका' च्या डेटा लीक प्रकरणात भारतात राजकीय खळबळ माजली आहे. आरोप लावण्यात आलेल्या या कंपनीला भारतातील अनेक राजकीय पक्षांनी कामे दिली आहेत. या प्रकरणात काँग्रेस मोठ्या प्रमाणात अडचणीत येताना दिसत आहे. भाजपने काँग्रेसवर आरोप लावण्यापूर्वी राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यातच 'कॅम्ब्रिज एनालिटिका' च्या एका माजी कर्मचाऱ्याने गोप्यस्फोट केला की त्यांना भारतातून खूप मोठ्या प्रमाणात काम मिळाले होते. खास करून काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात काम होते. 

Updated: Mar 27, 2018, 09:04 PM IST
 डेटा लीक :  'कॅम्ब्रिज एनालिटिका' ला भारतात मिळाले भरपूर काम, माजी कर्मचाऱ्याने घेतले काँग्रेसचे नाव  title=

नवी दिल्ली :  'कॅम्ब्रिज एनालिटिका' च्या डेटा लीक प्रकरणात भारतात राजकीय खळबळ माजली आहे. आरोप लावण्यात आलेल्या या कंपनीला भारतातील अनेक राजकीय पक्षांनी कामे दिली आहेत. या प्रकरणात काँग्रेस मोठ्या प्रमाणात अडचणीत येताना दिसत आहे. भाजपने काँग्रेसवर आरोप लावण्यापूर्वी राजकीय आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू झाला आहे. त्यातच 'कॅम्ब्रिज एनालिटिका' च्या एका माजी कर्मचाऱ्याने गोप्यस्फोट केला की त्यांना भारतातून खूप मोठ्या प्रमाणात काम मिळाले होते. खास करून काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात काम होते. 

अमेरिकेत फेसबूक डेटा लीक झाल्याच्या वृत्तात भारतातही अशा प्रकारचा डाटा चोरीला गेला असल्याच्या गोष्टी समोर आल्या आहेत. यात प्रमुख सहभाग असलेल्या ब्रिटनच्या कॅम्ब्रिज एनालिटिका कंपनीचे भारतात भरपूर ग्राहक आहेत. या संदर्भात या कंपनीचा माजी कर्मचारी विसलब्लोअर क्र‍िस्टफर विलीने  या संदर्भात गोप्यस्फोट केला आहे. मंगळवारी केलेल्या खुलाशानुसार त्याने सांगितले की त्याने भारतात राहून खूप काम केले आहे. तसेच त्याचे या ठिकाणी ऑफीसही होते. 

ब्रिटनच्या खासदारांसमोर दिलेल्या साक्षीनुसार विलीने सांगितले की सीए म्हणजे कॅम्ब्रिज एनालिटिका हा एक उपगुंतवणूकदारांचा ग्रुप आहे. ते आपले काम काढण्यासाठी कायदेशीर किंवा बेकायदा पद्धतीचा वापर करण्यात मागे पुढे पाहत नाही. 

विलीने ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमनमध्ये डिजिटल, कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट्स कमिटीच्या समोर ही साक्ष दिली. विलीने डेटा लीक प्रकरणात 'कॅम्ब्रिज एनालिटिका विरोधात आपली साक्ष दिली. 

या अनेक पक्षांचे नाव जाहीर केले, त्यात भारतात काँग्रेस पक्षाचे नाव घेतले आहे. मला पूर्ण विश्वास आहे की कॅम्ब्रिज एनालिटिकाचा एक क्लाएंट हा काँग्रेस पक्षही आहे. यात कोणता राष्ट्रीय प्रकल्प, किंवा क्षेत्रीय प्रकल्प होता हे आठवत नाही. 

विलीनुसार भारतातील अनेक राज्य ब्रिटन देशा इतके आहेत. असे असताना कॅम्ब्रिज एनालिटिकाने अनेक राज्यांमध्ये आपले ऑफिस आणि कर्मचारी ठेवले होते. भारतात काम केल्याचे पुरावाही त्याचेकडे असल्याचा गोप्यस्फोटही त्याने केला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्रपती निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणारी कंपनी 'कॅम्ब्रिज एनालिटीका'ने सुमारे ५ कोटी फेसबूक युजर्सची खासगी माहिती चोरली होती. यात ट्रम्प यांना मदत केली आणि विरोधी व्यक्तीची प्रतिमा खराब करण्यासाठी वापर करण्यात आला आहे.