Elon Musk Tweet on Covid-19 Booster Dose: जगातील सर्वात चर्चित व्यक्तीमहत्व स्पेस एक्स आणि ट्विटरचे प्रमुख इलॉन मस्क (Elon Musk) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. लहान वयात नाव, पैसा, इज्जत सर्वकाही कमवलेल्या मस्क यांची ख्याती गावगाड्यापर्यंत पसरली आहे. त्यांच्या ट्विटची (Elon Musk Tweet) सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसते. अशातच नुकतंच मस्क यांनी केलेल्या ट्विटमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्याची इंटरनेटवर चर्चेला उधाण आलंय. (Elon musk says i feel like dying tweet on side effects from second covid booster shot marathi news)
इलॉन मस्क यांनी कोविड लसीच्या दुसऱ्या बूस्टर डोसबाबत (Covid-19 Booster Dose) त्यांचा अनुभव शेअर करताना ट्वीट केलंय. त्या ट्विटमध्ये मस्क म्हणतात, पहिला mRNA चा बूस्टर डोस घेतल्यावर मला काहीही झालं नाही मात्र, दुसऱ्यांदा मला त्रास झाला, असं मस्क म्हणाले आहेत. पुढे बोलताना मस्क म्हणतात...
मला बर्लिन (berlin) येथे जायचं होतं, त्यावेळी अशा परिस्थितीत माझ्याकडं दुसरा कोणताही पर्याय नव्हता. यामुळे मला दुसरा बूस्टर डोस घ्यावा लागला, अशी माहिती मस्क यांनी ट्विटद्वारे दिली. कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस घेतल्यानंतर काही साईड इफेक्ट्सचा (side effects) सामना करावा लागला होता. त्यानंतर मला असं वाटलं होतं की, मी मरण यातनाच सोसतोय, असं मस्क (Elon Musk Tweet on Covid-19 Booster Dose) म्हणाले आहेत.
आणखी वाचा - Elon Musk ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार? कारण वाचून सगळेच झाले हैराण
दरम्यान, आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी मस्क यांना ओळखलं जातं. त्यांच्या स्वाभिमानासाठी त्यांनी थेट ट्विटर (Chief Executive Officer of Twitter) खरेदी केलं, अशी चर्चा आजही होताना दिसते. भारतात देखील बुस्टर डोसची प्रकिया (Booster Dose) सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या भारतात देखील मस्क यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया उमटत आहेत.