Trending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्...

Trending News : विमान हवेत, साधारण 30,000 फूट इतक्या उंचीवर असताना घडला हा गंभीर प्रकार. काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या.... 

सायली पाटील | Updated: Sep 6, 2024, 11:49 AM IST
Trending News : 'आज प्लेन तेरा भाई उड़ाएगा...' मद्यधुंद प्रवाशाचा विमानात गोंधळ; कॉकपिटमध्ये घुसला अन्... title=
Easyjet Drunk Passenger creates chaois in a flight trending news

Trending News : विमानप्रवासादरम्यान अनेकदा असे काही किस्से घडतात की सहप्रवाशांनाही त्यामुळं काहीशा पश्चातापाचा सामना करावा लागतो. सध्याच्या घडीला अशाच एका विमानप्रवासाचा किस्सा व्हायरल झाला असून, भलताच प्रकार पाहून अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कारण, विमान सुरू असतानाच अचानक त्यातील एका प्रवाशां मद्यधुंद अवस्थेत थेट कॉकपिटमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला आणि सहप्रवाशांच्या काळजात धस्स झालं. 

प्रवाशानं घातलेल्या या गोंधळामुळं अखेर या विमानाचं इमरजन्सी लँडिग करावं लागलं. जवळपास 30000 फूट इतक्या उंचीवर असणाऱ्या या विमानामध्ये घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून, या संपूर्ण प्रकारामध्ये प्रवाशानं क्रू मेंबरसी हुज्जत घालत इन फ्लाईट इंटरकॉमही तोडल्याचं पाहायला मिळालं. 

'द सन'च्या वृत्तानुसार हा प्रवासी इतका बेधुंद होता की त्यानं थेट एक्झिट गेट उघडण्याचा प्रयत्न करत विमानाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. क्रू मेंबर आणि इतर प्रवाशांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करूनही त्यानं उलट त्यांच्यावरच तो धावून गेला. या प्रवाशाला अखेर विमान लँड झाल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. 

एयरबस ए320 विमानातील या प्रवाशानं पायलटलाही चुकीच्या शब्दांमध्ये संबोधत थेट कॉकपिटमध्ये जाण्याचा प्कयत्न केला. त्यानं आपण स्वत: विमान नियंत्रणात आणू असं म्हणत सतत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. इथं विमानातील सहप्रवाशांना मनस्ताप होत असतानाच अखेर हे विमान जर्मनी येथील म्युनिकमध्ये लँड करण्यात आलं, जिथं पोलिसांनी त्याला तातडीनं ताब्यात घेतलं. ईज़ीजेट एअरलाईनमध्ये हा सर्व प्रकार घडला असून, सदर प्रकरणासाठी विमानसेवा पुरवणाऱ्या या कंपनीनं जाहीर माफी मागत अशा प्रवाशांना आणि अशा वर्तणुकीला सहन केलं जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं. 

हेसुद्धा वाचा : गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य

विमानानं प्रवास करत असताना अनेकदा असे काही प्रवासी भेटतात जे, विनाकारण लक्ष वेधतात. इथंही तेच झालं. पण, इथं या प्रवाशानं ितका गोंधळ घातला की, एक क्षण असा आला जिथं सहप्रवाशांनीच त्याच्या उच्छादाला कंटाळून त्याला विमानातून उतरवण्याती विनंती क्रू मेंबरकडे केली होती.