100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू महामारीवर लोकांनी या गोष्टीला औषध समजलं होतं?

सुमारे 100 वर्षांपूर्वी जेव्हा साथीचारोग जगात आला होता. तेव्हा व्हिस्की एक औषध म्हणून वापरली जात होती.

Updated: May 17, 2021, 05:12 PM IST
100 वर्षापूर्वी स्पॅनिश फ्लू महामारीवर लोकांनी या गोष्टीला औषध समजलं होतं? title=

मुंबई : सोशल मीडियावर कोरोनावर वेगवेगळे उपचार व्हायर होत आहे. परंतु त्या उपचारांमध्ये तज्ञांना काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. या सगळ्या उपचारांमधील लोकांनी सर्वात जास्त मनावर घेतलेला उपचार म्हणजे अल्कोहोल. बऱ्याच लोकांचे असे मानने आहे की, अल्कोहोलमुळे व्हायरसवर उपचार होऊ शकतो. परंतु कोणतेही संशोधन किंवा अभ्यासाने याला समर्थन दिले नाही. असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत की, मद्यपान केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होतो. अल्कोहोलिक सेनिटायझर हातावर लावणे किंवा कोणत्याही भागांवर लावून कोरोना विषाणुपासून बचाव करणे हे वेगळे आहे. परंतु काही आजारांवर अल्कोहोल उपाचार असल्याचे देखील समोर आले आहे.

सुमारे 100 वर्षांपूर्वी जेव्हा साथीचारोग जगात आला होता. तेव्हा व्हिस्की एक औषध म्हणून वापरली जात होती. 1918 साली स्पॅनिश फ्लू हा साथीचा रोग जगात पसरला होता. त्यावेळी लोकांनी साथीच्या आजारापासून मुक्त होण्यासाठी व्हिस्कीचा उपयोग केला होता. परंतु आता या गोष्टीमध्यो किती तथ्य आहे?  हे जाणून घेण्यासाठी बर्‍याच घटनांचा अभ्यास केला पाहिजे.

मीडिया रिपोर्टमध्ये याबद्दलचे पुरावे

4 एप्रिल 1919 रोजी टीओआय वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात असे म्हटले होते की, व्हिस्कीची मागणी अचानक वाढली आहे. आजारपण आणि मृत्यूमुळे निर्माण होणारी परिस्थिती देखील या मागणीच्या वाढीस कारणीभूत ठरली आहे. असे म्हटले होते की, त्यावेळी निर्बंधांच्या दरम्यान व्हिस्कीच्या विक्रीस परवानगी दिली गेली तर ती वैद्यकीय पद्धतीने वापरली जाईल.

अहवालात व्हिस्की घेण्याच्या फायद्यांबद्दलही शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. ते म्हणाले की, "व्हिस्की केवळ उत्तेजकच नाही तर एक शामक औषध म्हणजे वेदना कमी करणारी देखील आहे. व्हिस्की आजारी लोकांमध्ये असलली भीती आणि चिंता दुर ठेवते. ज्यामुळे माणसावर मानसिक त्रास येत नाही. त्यामुळे संसर्गापासून मुक्त होण्यास रुग्णांना मदत मिळते."

लोकांना अजूनही या गोष्टीचे आश्चर्य वाटते की, अमेरिकेत स्पॅनिश फ्ल्यू दरम्यान व्हिस्कीचा उपचारासाठी वापर केला जात होता. परंतु ही माहामारी कमी होत नव्हती त्यामुळे अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांनी व्हिस्कीवर बंदी घातली होती आणि त्या ठिकाणी व्हिस्की मिळणे जवळजवळ अशक्य झाले होते.

काही मीडिया अहवालात असे ही समोर आले आहे की, व्हिस्कीवर लावलेल्या या बंदीमुळे लोक काही लोकं हाता पाया पडू लागले आणि लोकांचे जगणे असहाय्य होऊ लागले. त्यामुळे मग अधिकाऱ्यांना जप्त केलेली अवैध दारू स्टोअरमधून विकण्याचा मार्ग काढला गेला.

काही अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये असे म्हटले गेले होते की, सैन्य शिबिरांमध्ये सैन्य दलाच्या जवानांना साथीच्या रोगांपासून वाचवण्यासाठी सैन्य डॉक्टर व्हिस्की वापराची शिफारस करत होते.  1918-19 मध्ये व्हिस्की आणि वाइनच्या लोकप्रियतेबद्दल अशा बर्‍याच बातम्या आणि जाहिराती प्रसिद्ध झाल्या.

यूएस नेव्हीच्या नर्सनेही स्वीकारले

Conde Nast travellerच्या वृत्तानुसार, अमेरिकेची नेव्ही परिचारिका जोसी माबेल ब्राउन 1918 मध्ये शिकागोजवळील नेव्हल स्टेशन ग्रेट लेक्समध्ये सेवा देत होती. त्यांना सांगितले की, "तेव्हा असे बरेच रूग्ण होते, ज्यांच्यावर उपचार करण्यासाठी आमच्याकडे वेळ नव्हता.

आम्हाला त्यांचे टेंपरेचर देखील तपासायला वेळ नव्हता. आमच्याकडे रक्तदाब मोजण्यासाठीही वेळ नव्हता. तेव्हा मग आम्ही काही लोकांना व्हिस्की दिली. आमच्याकडे हे करण्या इतकाच वेळ होता. त्यावेळी काहींना चक्कर येत होती, कुणाच्या फुफ्फुसांत हवा भरली होती, तर काहींना श्वास घेता येत नव्हता तो आमच्यासाठी अत्यंत वाईट टप्पा होता."

ती पुढे म्हणते, "हा सगळा भयंकर काळ होता. महामारी संपेपर्यंत आम्हाला दररोज 16-16 तास मास्क, गाऊन इ. घालावे लागल होते. त्यावेळी 6000 हून अधिक लोकं रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी रूग्णांचा ट्रॅक रेकॉर्ड हरवला होता. त्यामुळे त्यातील किती लोकं मेले हे कोणालाही माहिती नव्हते."

महामारीच्या वेळी डॅाक्टरांचा एक गट व्हिस्की आणि वाईन या आजारावर उपचार करु शकत नाहीत असे म्हणत होते. तर डॅाक्टरांचा दुसरा गट व्हिस्की आणि वाईन औषध म्हणून वापरण्याचा सल्ला देत होते.

महामारी संपल्यानंतर जेव्हा 1922 मध्ये अमेरिकन मेडिकल असोसिएशनने डॅाक्टरांचा सर्वे केला. तेव्हा त्यांना असे दिसून आले की, 51 टक्के डॅाक्टरांचे असे मानने होते की, थेरेपी एजेंट म्हणून व्हिस्की उपयुक्त आहे. त्याच्या नशेमुळे लोकांचा काही काळासाठी त्रास कमी होतो.

व्हिस्कीची मागणी अचानक का वाढली?

1919 साली काही डॅाक्टर्स लोकांना व्हिस्कीसाठी प्रिस्क्रिप्शन देत होते. ज्यामुळे लोकं व्हिस्की विकत घेऊ लागले. परंतु त्यानंतर खोटे प्रिस्क्रिप्शन देणाऱ्या 4 डॅाक्टरांना अटक करण्यात आली. हे डॅाक्टर प्रिस्क्रिप्शनमुळे प्रत्येक बॅाटलमागे 1 डॅालर कमवत होते, तर मेडिकल स्टोअर्स वाले 5 डॅालर्स कमवत होते. त्यावेळेला वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वेगाने पसरु लागली.

1918 मध्ये एका वृत्तपत्राच्या रिपोर्ट नुसार त्यावेळी व्हिस्कीचा खप 3 पटीने जास्त झाला होता. व्हिस्की घेणाऱ्यांमध्ये काही लोकं अशी होती की, ज्यांनी यापूर्वी व्हिस्की किंवा मद्यपान कधी ही केलं नव्हतं. परंतु डॅाक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमुळे त्यांना ते विकत घ्यावे लागले आणि लोकांनी असे ही म्हंटले आहे की, व्हिस्की प्यायल्या नंतर त्यांना बरे देखील वाटले आहे.

हे सर्व देखील खरं असलं तरी कोरोनावर मद्यपान करण्याचा सल्ला कोणत्याही डॅाक्टर किंवा तज्ञांनी दिलेला नाही. त्यामुळे डॅाक्टरांच्या सल्ल्यानेच कोरोनावर मात करा.