गाडी चालवताना झोप लागल्यामुळे अनेकवेळा जीवघेणे अपघात झाल्याचे आपण पाहिले असेल. घाटांमध्ये अशाप्रकारचे अपघात सर्सास होताना दिसतात. त्यामुळे अनेकजण असा प्रवास करण्याआधी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. मात्र दुर्दैवाने काही वेळा असे अपघात टाळता येत नाहीत.
मात्र तंत्रज्ञान विकसित होत असताना, अशा धोके कमी करण्यासाठी देखील काम केलं जात आहे. असचं काहीस प्रकरण बेल्जियममधून समोर आले आहे. बेल्जियममध्ये कार चालवत असताना एका व्यक्तीला झोप लागली.
दरम्यान, ही गाडी 25 ते 30 किमीपर्यंत आपल्या लेनमध्ये कोणालाही न धडकता पुढे जात राहिली. त्यामुळे कोणतीही हानी झालेली नाही.
माध्यमांच्या वृत्तानुसार, कार चालवत असताना ही व्यक्ती बेशुद्ध पडली. सुदैवाने त्याच्या कारमध्ये नवीन तंत्रज्ञान असल्याने कारचालकाचा जीव वाचला आहे.
नवीन तंत्रज्ञानामुळे कारच्या क्रूझ कंट्रोल आणि लेन असिस्टने गाडीने रस्ता सोडला नाही. ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडल्याचे समोर आले आहे.
बेल्जियममधील लुवेनकडे जाणाऱ्या रस्त्यावर 14 ऑगस्ट रोजी सकाळी 9 च्या सुमारास कार चालक बेशुद्ध पडला. रस्त्यावरून चालकाविना गाडी जाताना पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कार थांबवता न आल्याने प्रत्यक्षदर्शींनी आपत्कालीन सेवा आणि पोलिसांशी संपर्क साधला आणि कारच्या स्थानाबद्दल माहिती दिली.
ही कार रेनॉल्ट क्लियो असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचताच त्यांनी कशीतरी गाडी थांबवण्यात यश मिळाले. गाडी थांबवल्यानंतर त्याला 41 वर्षीय कारचालक ड्रायव्हरच्या सीटच्या मागे बेशुद्ध पडलेला दिसला.
त्यानंतर त्यांनी कारचालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याची मद्य आणि ड्रग्सची चाचणी करण्यात आली. मात्र, चाचणीबाबत अद्याप कोणतेही माहिती समोर आलेली नाही. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तो माणूस बेशुद्ध पडल्यानंतर कराने किमान 25 किलोमीटरचा प्रवास केल्याचे समोर आले.
दरम्यान, कार सतत डावीकडून उजवीकडे जात होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. कारमधील लेन असिस्ट आणि क्रूझ कंट्रोलमुळे कारचालक बेशुद्ध पडल्यानंतरही ती नियंत्रणात होती असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.
लेन असिस्टने खात्री केल्यानंतर कार रस्त्यावरुन बाहेर पडताच ती पुन्हा लेनच्या मध्यभागी आली गेली. दुसरीकडे, क्रूझ कंट्रोलने कारचा वेग स्थिर ठेवला. कार थांबवताना ती लेनमधून काढावी लागली त्यामुळे सुरक्षा अडथळ्याला आदळून ती थांबली.