कोरोना : डोनाल्ड ट्रम्प आजारी, व्हाइट हाऊसने दिले स्पष्टीकरण

कोरोना व्हायरसचा प्रसारानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजारी असल्याची बातमी पुढे आली आहे.  

Updated: Mar 11, 2020, 09:18 AM IST
कोरोना : डोनाल्ड ट्रम्प आजारी, व्हाइट हाऊसने दिले स्पष्टीकरण title=

वॉशिंग्टन : चीनमधून कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्या त्या चीनमध्ये ४००० लोकांचा बळी गेला आहे. जगभरात कोरोनाच्या बळींची संख्या वाढत आहेत. इराणमध्ये नव्याने ५३ लोकांचा मृत्यू झाल्याची बाब पुढे आली आहे. तर भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजारी असल्याची बातमी पुढे आली आहे. त्यांना कोरोना व्हायरची लागण झाली का, अशीही चर्चा सुरु झाली आहे. 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती चांगली आहे. त्यांची कोरोना विषाणू चाचणी करण्यात आलेली नाही, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे. ट्रम्प हे विषाणूग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्याने अनेक काँग्रेस प्रतिनिधींच्या संपर्कात आले आहेत. तरीही त्यांची कोरोना चाचणी करण्यास व्हाइट हाऊसने नकार दिला आहे. संपर्कानंतर संबंधित अमेरिकी काँग्रेस प्रतिनिधींनी स्वत:हून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता, अशी माहिती देण्यात आली होती.

व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्यांने स्पष्ट केले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांच्यात कुठलीही लक्षणे दिसलेली नाहीत. तसेच ते अमेरिकी काँग्रेस सदस्यांच्या संपर्कात आले होते. त्यांनाही कसलीही बाधा झालेली नाही.  त्यांच्यातही कोरोनाची लक्षणे दिसलेली नाहीत. अध्यक्ष हे कोरोना बाधित संशयितांच्या संपर्कात आलेले नाही, असेही व्हाइट हाऊसने स्पष्टे केले आहे.