डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील तब्बल 34 गुन्हे सिद्ध; अडल्ट स्टारकडे आहे त्यांचं सर्वात मोठं सिक्रेट... आता पुढे काय?

Donald Trump Latest News: इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षांना.... ट्रम्प यांच्यावपरील आरोप सिद्ध होताच काय होती त्यांची पहिली प्रतिक्रिया? जाणून घ्या आताच्या क्षणाची सर्वाच मोठी बातमी.   

सायली पाटील | Updated: May 31, 2024, 09:04 AM IST
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील तब्बल 34 गुन्हे सिद्ध; अडल्ट स्टारकडे आहे त्यांचं सर्वात मोठं सिक्रेट... आता पुढे काय?  title=
Donald Trump Hush Money Case former adult star latets updates

Donald Trump Hush Money Case: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी अर्थात गुप्तधनप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून, त्यांच्या नावे असणारे 34 गुन्हे सिद्ध करण्यात आले आहेत. एखाद्या राष्ट्राध्यक्षाला गंभीर प्रकरणी दोषी ठरवत त्याच्यावरील आरोप, गुन्हे सिद्ध केले जाण्याची ही पहिलीच वेळ असून, जागतिक राजकीय पटलावर सध्या हा मुद्दा बराच चर्चेत आला आहे. 11 जुलै रोजी ट्रम्प यांना सदर प्रकरणी शिक्षा सुनावली जाणार आहे. 

काय आहे नेमकं प्रकरण? 

ट्रम्प यांना दोषी ठरवण्यात आलेल्या या प्रकरणामध्ये खुद्द डोनाल्ड ट्रम्प आणि कधी एकेकाळी अडल्ट स्टार असणाऱ्या स्टॉर्मी डेनियल्स (Stormy Daniels)यांची नावं पुढे येतात. ट्रम्प यांनी आपल्याशी शरीरसंबंध ठेवले असून, 2016 च्या राष्ट्रपती निवडणुकीआधी यावर मौन पाळण्यासाठी ट्रम्प यांच्या वकिलांच्या वतीनं आपल्याला 130,000 डॉलर (1,08,54,486.50 रुपये)  देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचं डेनियल्सनं सांगितलं. न्यायालयानं या प्रकरणी 6 आठवड्यांमध्ये 22 साक्षीदारांची साक्ष घेतली. यामध्ये या अडल्स स्टारचाही समावेश होता. दरम्यान सातत्यानं आरोप होत असताना 2018 मध्ये ट्रम्प यांनी मात्र तिच्याशी आपला कोणत्याही प्रकारचा संबंध आला नव्हता असं स्पष्ट करत ही बाब जाहीरपणे नाकारली. 

कोणत्या आरोपांमुळं ट्रम्प अडचणीत? 

व्यावसायिक तपशीलामध्ये दिशाभूल केल्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर 34 गंभीर आरोप लावण्यात आले. यामध्ये डेनियल्सला देण्यात आलेल्या 130,000 डॉलर (1,08,54,486.50 INR) या रकमेसंबंधीचा हिशोब लपवण्याचाही गंभीर आरोप असून ही रक्कम देत या महिलेला मौन पाळण्यास भाग पाडण्यात आल्याचं सांगितलं गेलं. (Hush Money Case)

ट्रम्प यांच्यावरील या आरोपांसंदर्भातील चौकशी आणि त्यानंतरची साक्ष ऐकल्यानंतर 2016 च्या निवडणुकीदरम्यान त्यांनी निकालांवर प्रभाव पाडण्यासाठी अडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्सला मोठी रक्कम देण्यासाठी आर्थिक तरतुदींमध्ये फेकफार केल्याचे आरोप आणि त्याप्रकरणीचे गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयीन खंडपीठातील ज्युरिंनी स्पष्ट केलं. राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रतिमेला धक्का देत त्यासाठी बेकायदेशीर कृत्य करत आणि नकारात्मक माहितीची गळचेपी करत सत्य दडवून ठेवण्याचे आरोप त्यांच्यावर लावण्यात आले होते. 

हेसुद्धा वाचा : Jammu and Kashmir Accident: जम्मू काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 22 भाविकांचा मृत्यू 

एकिकडे ट्रम्प यांना दोषी ठरवण्याचा हा निकाल ऐतिहासिक असल्याचं म्हटल जात असतानाच दुसरीकडे खुद्द ट्रम्प यांनी हा निकाल अपमानजनक असल्याचं सांगत खरा निकाल 5 नोव्हेंबर 2024 रोजीच लागेल असं म्हणताना आगामी राष्ट्रपती निवडणुकांकडे लक्ष वेधलं.